Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महापालिकांनी लसीकरणासाठी लसखरेदी करावी

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

May 16, 2021
in सरकारी बातम्या
0
eknath shinde

मुक्तपीठ टीम

कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली तरी तिसऱ्या लाटेची तयारी करण्यावर राज्य शासनाने सर्वतोपरी लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी लसीकरणावर मोठ्या प्रमाणावर भर देण्यात येत आहे. सध्या लशीची पुरवठ्यात काही अडथळे येत असल्यामुळे एमएमआर प्रदेशातील महापालिकांनी आपल्या स्तरावर लसखरेदी करून नागरिकांच्या लसीकरणासाठी पुढाकार घेण्याचे निर्देश राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

केंद्र तसेच राज्य सरकारकडून लसीचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, मागणी आणि पुरवठा यात तफावत असल्यामुळे महापालिकांवरही ताण येत आहे. यावर मार्ग म्हणून महापालिकांनी स्वतःच्या स्तरावर लसखरेदी करावी, असे निर्देश शिंदे यांनी ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि पनवेल या महापालिकांना दिले आहेत. मुंबई महापालिकेने अलिकडेच ५० लाख लसींच्या खरेदीसाठी जागतिक निविदा प्रक्रिया राबवली आहे. याच धर्तीवर एमएमआरमधील सर्व महापालिकांनी आपल्या शहरांमधील नागरिकांसाठी आवश्यक लसीचे प्रमाण आणि सरकारकडून होणारा पुरवठा याचा अंदाज घेऊन येणारी तूट भरून काढण्यासाठी लस खरेदी प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत.

यासंदर्भात शिंदे म्हणाले की, राज्य सरकार लसीकरण सुरळीत व्हावे आणि लोकांचा त्रास कमी व्हावा, यासाठी हरेक प्रयत्न करत आहे. लसींचा तुटवडा लक्षात घेऊन १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण स्थगित करण्यात आले असून ४५ व त्यापुढील वयोगटातील ज्यांनी पहिला डोस घेतला आहे, अशांना दुसरा डोस देऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, तिसऱ्या लाटेला थोपवायचे असेल तर अधिकाधिक लसीकरण होणे आवश्यक असल्याने महापालिकांनी आपल्या स्तरावर लसखरेदी प्रक्रिया राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


Tags: coronaEknath Shindeएकनाथ शिंदेकोरोना
Previous Post

देशात प्रथमच महाराष्ट्राने आयोजित केली अभिनव ऑनलाईन वैद्यकीय परिषद

Next Post

पेट्रोल शंभरी पार, खतांच्या किंमती भरमसाठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

Next Post
jayant patil

पेट्रोल शंभरी पार, खतांच्या किंमती भरमसाठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!