मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या दुसर्या लाटेशी भारत झुंज देत असताना अनेक क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे येत आहेत. भारताचा निवृत्त अष्टपैलू क्रिकेटर इरफान पठाणनेही मोठा निर्णय घेतला आहे. इरफाननं सोशल मीडियावरून चॅरिटीसाठी गोळा केलेली संपूर्ण रक्कम कोरोना लढ्यासाठी देण्याचं जाहीर केलंय.
गरजूंच्या मदतीसाठी पठाण फॅमिली नेहमीच तत्पर
- इरफानने अशाप्रकारे केलेल्या मदतीची ही पहिली वेळ नाही आहे.
- तसेच तो आणि त्याचा मोठा भाऊ युसूफ दक्षिण दिल्लीतील क्रिकेट अकादमी ऑफ पठाणच्या माध्यमातून कोरोना बाधितांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवण पुरवत आहे.
- त्याचबरोबर पठाण बंधूंचे वडील महमूद खान देखील आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून गुजरातमधील वडोदऱ्यात कोरोना रुग्णांची वेगवेगळ्या माध्यमातून सेवा करत आहेत.
- आतापर्यंत ९० हजार कुटुंबियांना मदत करण्यात आली आहे.
- पठाण कुटुंबाने आतापर्यंत ९० हजार कुटुंबांना मदत केली आहे.
- गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्येही पठाण कुटुंब मदतीसाठी पुढे आले होते.
- स्वत: च्या गावी वडोदऱ्यात चार हजार मास्कचे वाटप केले गेले.
- पोलिसांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्हिटॅमिन सीच्या गोळ्याही वाटण्यात आल्या होत्या.
केवळ कोरोना साथीतच नाही तर वेळोवेळी इरफान आणि युसुफ समाजाचं देणं फेडण्याच्या भावनेतून मदतकार्यात सहभागी असतात. २०१८ मध्ये केरळमध्ये पूर आलेला त्यावेळेस, त्यांनी राज्यात बाधित लोकांसाठी मदत सामुग्रीचीही व्यवस्था केली होती. त्यांनी औषधे, अन्न, इनरवेअर, चप्पल, लुंगी, ब्लँकेट्स या वस्तू पूरग्रस्तांना पुरवल्या होत्या.
पाहा व्हिडीओ: