मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी झुंज देत असलेले काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन झालं आहे. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील २१ दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांना न्युमोनियाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. उपचारादरम्यानं त्यांचं निधन झालं.
खासदार राजीव सातव यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. नुकताच त्यांचा कोरोना अहवाल हा निगेटिव्ह आला होता. पण त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती. न्युमोनियासोबतचं त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवा विषाणू आढळला. त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली.