मुक्तपीठ टीम
गेले सव्वा वर्ष कोरोना संकटाशी झुंज देत असतानाच भारतातील सोन्याच्या आयातीत विक्रमी वाढ होत आहे. वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये सोन्याच्या आयातीमध्ये मागील वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत २,२०,३५७.२४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अर्थात गेल्या वर्षी एप्रिलमध्ये राष्ट्रीय पातळीवरील लॉकडाऊनमुळे संपूर्ण व्यवहार ठप्प होते, त्यामुळे ही वाढ त्यामुळे अवाढव्य दिसत असण्याची शक्यता आहे.
सोन्याच्या आयातीत महाप्रचंड वाढ नेमकी कशामुळे?
• वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सोन्याचा झगमगाट वाढताना दिसत आहे.
• २०२१च्या एप्रिलमध्ये ६.२३ अब्ज डॉलर्स किंमतीच्या सोन्याची आयात करण्यात आली.
• २०२०च्या एप्रिलमध्ये केवळ २८ लाख डॉलर्स किंमतीच्या सोन्याची आयात करण्यात आली होती.
• रत्ने व दागिन्यांसाठीच्या निर्यातीची मागणी वाढल्यामुळे सोन्याच्या आयातीमध्येही वाढ नोंदली गेली, असे कारण सांगितले जात आहे.
• मात्र त्याचवेळी वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत यंदा एप्रिलच्या निर्यातीत १९५.७२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
• यावर्षी एप्रिलच्या निर्यातीतील वाढ ही २०१९ च्या एप्रिलच्या तुलनेत ही वाढ १७.६२ टक्क्यांनी वाढली आहे.
देशाची आर्थिक परिस्थिती सुधारत असल्याचा दावा
• वाणिज्य सचिव अनूप वाधवन यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, निर्यातीची सर्व क्षेत्र पुन्हा जोर धरत आहेत.
• चालू आर्थिक वर्षात ४०० अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे २९ लाख कोटी रुपयांच्या निर्यातीचे लक्ष्य ठेवले गेले आहे.
• गेल्या एप्रिलच्या तुलनेत यावर्षी एप्रिलमध्ये रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीत १६०.२४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
• निर्यातीबरोबरच आयातीमध्ये वाढ झाल्याने अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येण्याची चांगली चिन्हे आहेत.
• गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत एप्रिल महिन्यात आयात १६७.०५ टक्क्यांनी आणि एप्रिल २०१९ च्या तुलनेत ७.८७ टक्के वाढली आहे.
• चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात वस्तू व सेवा क्षेत्राच्या निर्यातीतही चांगली कामगिरी झाली आहे.