मुक्तपीठ टीम
टाटा मोटर्सनंतर आता देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपल्या ग्राहकांच्या वाहनांची फ्री सर्व्हिसिंग आणि वॉरंटीची मुदत वाढवली आहे. मारुतीची ही ऑफर, ज्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी किंवा फ्री सर्व्हिसिंगची मुदत १५ मार्च ते ३१ मे दरम्यान कालबाह्य होणार आहे, अशांसाठी आहे. आता कंपनीने ती मुदत ३० जूनपर्यंत वाढवली आहे.
लॉकडाऊनमुळे ग्राहक त्यांची कार सर्व्हिस सेंटरवर नेऊ शकत नाहीत. परंतु आता काळजी करण्याची गरज नाही. पुढील महिन्याच्या ३० जूनपर्यंत त्यांना या सेवांचा लाभ घेता येणार आहे.
लॉकडाऊनमुळे घेतलेला हा निर्णय
• मारुती सुझुकी इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संचालक (सेवा) पार्थो बॅनर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन मुळे ग्राहकांना घराबाहेर पडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे कंपनीने ग्राहकांच्या सोयीसाठी ही घोषणा केली आहे.
• वाहनांची विनामूल्य सर्व्हिस, वॉरंटी आणि एक्सटेंडेड वॉरंटी ३० जूनपर्यंत वाढविली आहे.
• प्रायमरी वॉरंटी, एक्सटेंडेड वॉरंटी आणि विनामूल्य आणि पीएमएस सर्व्हिसेस यासाठी शेड्यूल एक्सपायरी ही ३० जून, २०२१ पर्यंत असणार आहे.
टाटा मोटर्सनेही वाढवली फ्री सर्व्हिसची मुदत
• टाटा मोटर्सनेही याआधीच ज्या ग्राहकांची वॉरंटी आणि फ्री सर्व्हिस १ एप्रिल आणि ३१ मे पर्यंत आहे, ती आता ३० जून जूनपर्यंत वाढवल्याचं जाहीर केलं आहे.
• कोरोनाच्या दुसर्या लाटेचा प्रभाव आणि लॉकडाऊनमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ: