मुक्तपीठ टीम
कोरियाने भारतात अधिक वैद्यकीय पुरवठा पाठवला आहे. दक्षिण कोरिया भारत देशातील कोरोनाच्या या भीषण परिस्थितीत वाढत्या संसर्गाला लढा देण्यासाठी भारताला आपत्कालीन वैद्यकीय सहाय्य देत आहे. १३, १४ आणि १६ मे रोजी १०० पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स, १० व्हेंटिलेटर्स, १०० नेगेटिव्ह प्रेशर कॅरिअर आणि १०,००० अँटीजेन डिटेक्शन किट्ससह (२,५०,००० चाचण्यांसाठी) दक्षिण कोरियाची वैद्यकीय मदत घेऊन विमान भारतात आले आहे. पहिले विमान नुकतेच १३ मे ला संध्याकाळी ४:३० वाजता पोहोचले आहे. ही वैद्यकीय मदत भारतीय नागरिक, रुग्णालये आणि हेल्थकेअर सेंटर्सना देण्यात येईल.
कोरियन सरकारने यापूर्वी ९ आणि १२ मे रोजी दोन विमानांनी भारतात वैद्यकीय पुरवठा पाठविला होता. २३० ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स, रेग्युलेटरसह २०० ऑक्सिजन सिलिंडर्स आणि १०० नेगेटिव्ह प्रेशर कॅरिअर इत्यादी वैद्यकीय साहित्य पाठवले होते. कोरानाच्या या भयावह स्थितीत दक्षिण कोरिया भारतासोबत आहे. दक्षिण कोरिया कोरोनाविरूद्ध लढाई लढण्यास भारताला मदतीचा हात पुढे करत राहील. येत्या काही दिवसांत आणखी वैद्यकीय मदत कोरियाकडून देण्यात येईल.
भारताने १३ मे रोजी संध्याकाळी दाखल झालेल्या १०,००० रॅपिड टेस्टिंग किटच्या मदतीचे स्वागत केले, ही माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली. बागची यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, “कोरिया प्रजासत्ताकासह आमचे निरंतर सहकार्य आहे. प्रजासत्ताक कोरियाकडून आलेल्या १०,००० रॅपिड टेस्टिंग किटच्या सहकार्याचे स्वागत आहे”
🇮🇳🇰🇷
Our continuing cooperation with Republic of Korea. Welcome the shipment of 10000 rapid testing kits from Republic of Korea that arrived today. pic.twitter.com/OjG9oZMlPq— Arindam Bagchi (@MEAIndia) May 13, 2021
भारत कोरोनाविरूद्ध लढा देत असताना, वैद्यकीय संकटात देशाला पाठिंबा देण्यासाठी जगभरातून साथ मिळत आहे. अनेक देशांनी ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स, औषधे, पीपीई किट आणि इतर कच्चा माल पाठविला आहे.