मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका दाम्पत्याने कार खरेदी करण्यासाठी आपल्या नवजात बाळाचा सौदा केला आहे. या घटनेमुळे अनेकांना धक्का बसला आहे. या दाम्पत्याने आपल्या नवजात बाळाला एका व्यावसायिकाला दीड लाखांना विकलं आणि त्या पैशातून सेकंड हँड कार विकत घेतली. आजी-आजोबांनी या प्रकरणाची पोलिसांत तक्रार केल्यानंतर संबंधित प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी नवजात बाळाच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनंतर तपासात काय?
- बाळाच्या आजी-आजोबांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलीने आणि जावयाने कार खरेदी करण्यासाठी आपल्या नवजात बाळाला दीड लाखात गुरसहायगंज येथील एका व्यावसायिकाला विकलं.
- दरम्यान, तक्रार दाखल होताच या घटनेचा पोलिसांनी तपास सुरु केला होता.
- तपासात समोर आलो की, कन्नौज जिल्ह्याच्या तिरवा कोतवाली भागात तीन महिन्यापूर्वी या बाळाचा जन्म झाला होता.
- तसेच एका पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले की, नवजात बाळ अजूनही व्यावसायिकाच्या ताब्यात आहे. या प्रकरणी पोलीस संबंधित दाम्पत्याची चौकशी करत आहोत.
दरम्यान, पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर कन्नौज जिल्ह्यातील नागरिकांना मोठा धक्क बसला आहे. या दाम्पत्यांनी आपल्या नवजात बाळ विकल्यानंतर आठ दिवस कुणालाही याची भनक लागू दिली नाही. मात्र नातवाच्या आजी आजोबांना ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.