मुक्तपीठ टीम
कोरोना संकट काळात ऑक्सिजन ही संजिवनी ठरत आहे. त्याचवेळी त्याची टंचाईही भेडसावत आहे. त्यामुळे दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या आमदार आतिशी सिंह आणि सौरभ भारद्वाज यांनी कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लायब्ररी सुरु केली आहे.
त्यांच्या विधानसभा मतदार संघातील कोणत्याही व्यक्तीस ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची गरज भासल्यास त्यांना हे लायब्ररीमधून मोफत देण्यात येईल. कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना सहसा चार ते पाच दिवस ऑक्सिजनची आवश्यकता असते. म्हणूनच, साधारणपणे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर एका व्यक्तीला पाच दिवस दिला जाईल. यानंतर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुन्हा लायब्ररीत जमा करावे लागेल. जेणेकरून दुसऱ्या गरजूंना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले जाऊ शकेल.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लायब्ररीचे काम कसे चालणार?
• या आमदारांच्या विधानसभा मतदार संघातील कोणत्याही व्यक्तीस ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची गरज भासल्यास त्यांना या लायब्ररीमधून मोफत देण्यात येईल.
• कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना सहसा चार ते पाच दिवस ऑक्सिजनची आवश्यकता असते.
• म्हणूनच, साधारणपणे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर एका व्यक्तीला पाच दिवस दिला जाईल.
• यानंतर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुन्हा लायब्ररीत जमा करावे लागेल.
• जेणेकरून दुसऱ्या गरजूंना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले जाऊ शकेल.
• ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसाठी रुग्णाचे आधार कार्ड आणि डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन सादर करावे लागेल.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लायब्ररी सतत कार्यरत
• • स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक आरडब्ल्यूएकडूनही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसाठी मदत घेतली जात आहे.
• संपूर्ण विधानसभा मतदार संघासाठी स्वयंसेवक सक्रिय आहेत, ज्यांच्याकडे गरजू ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसाठी कॉल करतील.
• मशीनसाठी कॉल आल्यानंतर आधार कार्ड व डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन पडताळून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले जाते.
• पहिल्याच दिवशी या चार स्वयंसेवकांकडे चौकशीसाठी आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसाठी जवळपास दिडशे कॉल आले.
पाहा व्हिडीओ: