Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डॉक्टरांचा सेवाभाव, उरलेली औषधं जमवून गरजूंना वाटप

May 14, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
made for more

मुक्तपीठ टीम

 

देशात कोरोनाचं संकटाची दुसरी लाट उसळलेली असतानाच माणुसकीची प्रसन्नताही बहरत आहे. त्यामुळे मनाला एक वेगळा दिलासा मिळत आहे. ताजं उदाहरण मुंबईतील एका डॉक्टर दांपत्याचं आहे. ते एका वेगळ्या संकल्पनेवर काम करत आहेत. ते कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांकडून उरलेली औषधे गोळा करतात आणि गरजू रूग्णांना पुरवतात. डॉ. मार्कस रन्ने आणि त्यांची पत्नी डॉ. रॅनाने ‘मेड फॉर मोअर’ ही मोहीम सुरू केली. कोरोनाविरुद्ध युद्ध जिंकलेल्या रूग्णांकडे उरलेली चांगली औषधे गोळा करणे आणि गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवणे हे त्यांच्या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

 

त्यांनी हा उपक्रम एक मेपासून सुरू केला आहे. ते गृहनिर्माण संस्थांकडून औषधे गोळा करतात आणि ज्यांना गरज असेल त्यांना पुरवतात. जेव्हा त्यांच्या कर्मचार्‍यांमधील एका कुटुंबाला कोरोना झाला आणि औषधाची गरज भासली तेव्हा ही कल्पना सुचली. त्यांनी कोरोनावर मात केलेल्या रुग्णांकडून औषधे गोळा करून ती गरजूंपर्यंत पोहचवण्याचा निर्णय घेतला.

 

‘मेड फॉर मोअर’चे काम चालते कसे?

• या डॉक्टर दांपत्याने १०० इमारतींची साखळी तयार केली आहे.
• तेथे असलेल्या सहकारी संस्था इमारतींमधून उरलेली औषधे गोळा करतात आणि त्यांना पाठवतात.
• त्यांची आठ लोकांची एक टीम आहे आणि सोबत विविध इमारतींमधील स्वयंसेवक.
• जे औषधे खरेदीसाठी बाहेर जाऊ शकत नाहीत किंवा ज्यांना औषधांची खूप गरज आहे, अशाना मदत करण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरु झाले.
• या जोडप्याने अवघ्या १० दिवसात बरे झालेल्या रूग्णांकडून २० किलो औषधे गोळा केली.
• ही औषधे संपूर्ण भारतातील ग्रामीण जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रांना दान करण्यात येतील, जिथे त्यांची सर्वात जास्त आवश्यकता आहे.

 

गेल्या आठवड्यात त्यांनी २० किलो औषधे गोळा केली. ती औषधे स्वयंसेवी संस्थांना पाठवली गेली. ‘मेड फॉर मोअर’ने कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या अँटीबायोटिक्स, फॅबिफ्लू, वेदना कमी करणारी औषधे, स्टिरॉइड्स, इनहेलर, जीवनसत्त्वे, अँटासिड्स इत्यादी सर्व प्रकारची औषधे गोळा केली. याव्यतिरिक्त, ते पल्स ऑक्सिमीटर आणि थर्मामीटरसारखी मूलभूत औषधी साधने देखील गोळा करीत आहेत. याबद्दल माहिती मिळू लागल्यानंतर शेजारच्या इमारतींमधील रहिवाशांनी स्वेच्छेने औषधे संकलन करण्यास प्रारंभ केला आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: coronamade for moreकोरोनाडॉ. मार्कस रन्नेमेड फॉर मोअर
Previous Post

शेतकरी पिकवणार गॅस! चंदगडात पहिला गवत गॅस प्रकल्प

Next Post

ऑक्सिजन लंगरनंतर दिल्लीत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लायब्ररी

Next Post
Delhi

ऑक्सिजन लंगरनंतर दिल्लीत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लायब्ररी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!