मुक्तपीठ टीम
ईद आणि भाईजान सलमान खानच्या चित्रपटांच्या प्रदर्शनामध्ये एक खास कनेक्शन असल्याचे म्हटले जाते. ईदला सलमान खानच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाचा अर्थ म्हणजे बॉक्स ऑफिसवर तो चित्रपट हिट होणार हे नक्की. एक किंवा दोन अपवाद वगळता ईदला प्रदर्शित होणाऱ्या सलमानच्या चित्रपटांना त्याच्या चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे सलमान खान आपले चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित करत असल्याचे पाहायला मिळते.
सलमान खानचा ‘राधे-यूअर मोस्ट वॉन्टेड भाई‘ हा चित्रपट मागील वर्षी ईदला प्रदर्शित केले जाणार होता. पण कोरोनाच्या संकटामुळे चित्रपटाचे प्रदर्शन स्थगित करण्यात आले होते. तर आता येत्या १३ मे रोजी ईदच्या दिवशी ‘राधे’ चित्रपट प्रदर्शित केले जाणार अशी घोषणा करण्यात आली आहे.
View this post on Instagram
सलमानने ‘राधे’ चित्रपट ईदलाच प्रदर्शित करायचे ठरविले होते. त्यामुळे हा चित्रपट आता चित्रपटगृहांसह डिजिटल प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांतील चित्रपटगृह बंद असल्याने या चित्रपट प्रदर्शनाला ‘टोकन रिलीज’ असे म्हटले जाईल.
असे जुळलं सलमानचे चित्रपट आणि ईदचं नातं…
• वॉन्टेडपासून सलमान खानचे सर्वच चित्रपट ईदला प्रदर्शित होत नव्हते.
• देशातील काही भागात सलमान खानची लोकप्रियता लक्षात घेता, तेथे ईदच्या दिवशी सिंगल स्क्रीन चित्रपटगृहात त्यांचे जुने चित्रपट प्रदर्शित करण्याची प्रथा होती.
• सर्व प्रथम सलमान खानच्या चित्रपटाचा ईद कनेक्शन २००९ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘वॉन्टेड’ चित्रपटापासून झाला होता, पण ते योगायोगानं घडलं.
• २००९मध्ये ईद २० सप्टेंबरला साजरी करण्यात आली होती. तर वॉन्टेड हा चित्रपट १८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला होता.
• त्यावेळी या चित्रपटाने ६० कोटींची कमाई केली असून जबरदस्त हिट झाला होता.
प्रदर्शनासाठी ईद, सलमानचा चित्रपट हिट!
• ‘वॉन्टेड’च्या यशनंतर निर्मात्यांचाही असा ग्रह झाला की, ईदच्या दिवशी सलमान खानसोबतचा आपला चित्रपट प्रदर्शित केला तर तो नक्कीच हिट होणार.
• सलमान खाननेही तसंच मानलं.
• सलमानचा जेव्हा जेव्हा ईदला चित्रपट प्रदर्शित केला जायचा तो बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत असत.
• २०१० मध्ये सलमानचा ‘दबंग’ हा चित्रपट ईदला प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाला त्यांच्या चाहत्यांनी १४० कोटींची कमाई करुन दिली होती. हा चित्रपट अभिनव कश्यप यांनी दिग्दर्शित केला होता.
• २०११ मध्ये ‘बॉडीगार्ड’ हा चित्रपट ईदला प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट दिग्दर्शिक सिद्दीक यांनी दिग्दर्शित केला होता. यात करिना कपूर प्रमुख भूमिकेत होती. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर १४९ कोटींची कमाई केली होती.
• २०१२ मध्ये सलमान खानचा ‘एक था टायगर’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. कबीर खान यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून या चित्रपटाने १९९ कोटींची कमाई केली होती.
• २०१४ मध्ये साजिद नाडियाडवाला निर्मित ‘किक’ हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आला होता. याचित्रपटाने २३२ कोटींची कमाई केली होती.
• २०१५ मध्ये सलमानचा ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट ईदला प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून ३२१ कोटींची कमाई केली होती.
• २०१६ मध्ये ‘सुलतान’ हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींची कमाई केली होती.
• २०१९ मध्ये ‘भारत’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०९ कोटींची कमाई केली होती.