मुक्तपीठ टीम
मच्छिमार आणि शेतकरी दोघेही सारखेच. दोघेही कष्टकरी. दोघांचेही व्यवसाय निसर्गावर अवलंबून. दोघांचाही मनं विशाल…कोळ्यांचे समुद्रासारखं तर शेतकऱ्यांचं आकाशासारखे. पालघर जिल्ह्यातील तारापूरच्या मच्छिमारांनी नुकतंच असं समुद्रासारखं मोठं मन दाखवले.
मासेमारी करताना जाळ्यात अडकलेल्या फिनलेस पोरपॉइस या दुर्मिळ माशाला स्थानिक मच्छिमारांनी सुखरूप समुद्रात सोडलंय . तारापूर येथील जगदीश विंदे यांनी समुद्र किनाऱ्यावर टाकलेल्या जाळ्यात हा दुर्मिळ मासा अडकला होता. तो सुटकेसाठी धडपड करत होता. त्यावेळी विंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेत या माशाची सुखरूप सुटका केली. त्यांनी या माशाला पुन्हा पाण्यात सोडले.
फिनलेस पोरपॉइस हा मासा दुर्मिळ मानला जातो. त्याची लांबी साधारणतः दीड ते दोन मीटर पर्यँत असते. तसेच त्याचं वजन सुमारे ४५ किलोग्रॅम पर्यँत असते. हा मासा मुख्यतः उत्तर अटलांटिक महासागर, उत्तर समुद्र, बाल्टिक समुद्रात आढळून येतो. थंडीच्या काळात उष्ण कटिबंधात असलेल्या समुद्र किनाऱ्याच्या परिसरात क्वचितच दिसतो.
पाहा व्हिडीओ: