प्रा. राम जाधव
कोरोनाने सर्वत्र कहरच केला आहे. या भीषण परिस्थितीत अनेकांना आपला जीव ऑक्सिजन अभावी तर काहींना बेड अभावी गमवावा लागत आहे. अशीच एक मन हेलावणारी घटना धुळे जिल्ह्यात घडली आहे. या नियतीचा खेळ कोणाला त्याच्यापासून वाचवू शकला नाही. धुळे जिल्ह्यात एका आई-वडिल आणि त्यांच्या शिक्षक मुलाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या शिक्षकाचे नाव तुषार बापू खोंडे असे आहे.
तुषारच्या कुटुंबात आई-वडिल, बहिण, तुषार आणि त्याचा जुळा भाऊ आणि भावाची पत्नी व मुलगी असे त्यांचे कुटुंब होते. ५ एप्रिलला तुषारची आई पॉझिटिव्ह आढळली. २-३ दिवस घरीच काळजी घेतली. नंतर त्यांना धुळे येथील लोकमान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु या कठीण काळात ऑक्सिजनअभावी दोन दिवसांनी त्यांना सिव्हील रूग्णालयात दाखल केले. पुन्हा लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरळित झाल्याने त्यांना पुन्हा तेथे हलवण्यात आले. परंतु नियतीपुढे कोणाचे काही चालत नाही १५ एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला.
व्यवस्थेने दुर्लक्षित केलेल्या घटकांना @Muktpeeth च्या माध्यमातून न्याय देण्याचे काम होते आहे, म्हणून #आणखी_तुषार_नको ही आर्त हाक समाज मनाला मानवतेचा संदेश देते आहे. #शिक्षणसेवक कायमच गुलाम ठरविला गेला..
या अन्यायिक, अमानवी शृंखला आता तुटतील का? @CMOMaharashtra @VarshaEGaikwad pic.twitter.com/NFNdzkmJe6— Ram Jadhav (@RamJadh30112459) May 12, 2021
याच दरम्यान तुषारचे वडिल बापू खोंडे हे ही पॉझिटिव्ह झाले होते. त्यांच्या पत्नीच्या मृत्यूची घटना त्यांना कोणा सांगितलेली नव्हती. परंतु त्यांनीही १८ एप्रिलला अखेरचा निरोप घेत श्वास सोडला. अशा परिस्थितीतच तिथं रायगडला त्यांचा मुलगा तुषार पॉझिटिव्ह आढळला होता. तो उपचारासाठी रायगडहून धुळ्याला आला होता. तुषारला त्याचे वडिल गेल्याचे माहित नव्हते. आई आपल्याला सोडून गेली, वडिलही अॅडमिट आहेत आणि तो स्व:ताही अॅडमिट आहे या गोष्टी तुषारला वेदनादायी वाटत असत. वडिलांना आई गेल्याचे माहित नव्हते त्याचप्रमाणे तुषारला वडिल गेल्याचे माहित नव्हते.
तुषार रूग्णालयात उपचारांना प्रतिसाद देत होता. २५ एप्रिलला तपासणी दरम्यान त्याची स्थिती गंभीर झाली. डॉक्टरांचे म्हणणे होते की, तो ५ ते ६ दिवस उपचारांना प्रतिसाद देऊ शकेल. परंतु तो पुढील दोन आठवड्यात बराही झाला. त्याचा मित्र देवेंद्र त्याला एक-दोन दिवसांनी भेटायला येत असे. तुषार आणि देवेंद्रच्या गप्पा रंगत असत, चर्चा रंगायच्या, तो घरची विचारपूस करित असे. देवेंद्रने तुषारला धीर देण्याचं आणि सावरण्याचं काम केलं. तुषार हळू-हळू बरा होत होता. भाऊ, बहिण, वहिनीही आनंदी होते. तुषारचा शिक्षक मित्र परिवारही आनंदी होता. त्याची बहिणही बरी होऊन घरी आली होती. कुटुंबातील एक भाऊ सोडला तर सर्वजण कोरोनाबाधित झाले होते. परंतु शेवटी नियतीने आणखी एक क्रूर डाव टाकला आणि तुषारचा अचानक मृत्यू झाला.
प्रशासनाने आता तरी दखल घ्यावी, शिक्षण सेवकांना समान काम समान वेतन मिळावे. कोविड १९ सारख्या कठीण परीस्थितीत ६००० रुपये मानधन एवढ्या अल्प पैशात कुटुंब कसे चालवायचे, आरोग्यचा प्रश्न कसा मिटवायचा. शिक्षण सेवकांना विमा कवच आणि वैद्यकीय सुविधा मिळायलाच पाहिजे
— Sachin Dange (@SachinD32546866) May 12, 2021
२०१७ मध्ये राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाली होती. डी.एड, बी.एड झालेल्या युवकांना भारतीय जनता पार्टीच्या सरकारने १२००० शिक्षक रिक्त पदांची घोषणा केली होती. तुषार एक गुणवत्ताधारक शिक्षक होता म्हणून अडीच लाख विद्यार्थ्यातून साडेपाच हजार भरलेल्या पदभरतीत त्याची रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत निवड झाली होती. तुषारला दरमहा वेतन ६००० रूपये होते. शिक्षणसेवकांना निदान जगता येईल एवढं तरी मानधन द्यावं. घरापासून हजारो कि.मी दूर राहाणाऱ्यांना ६००० हजार मानधन द्यायचे त्यांनी जगायचे तरी कसे?
आता आम्हला एकच प्रश्न @VarshaEGaikwad आपणास विचारावा वाटत आहे , सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
— डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्य (@Mha_Teacher) May 12, 2021
तुषारच्या परिवाराला शासनाकडून मदत मिळेल का? असे सर्व प्रश्न उपस्थित होऊ लागले. तुषार सरकारी कर्मचारी होता. ऑनड्युटी होता. कोरोना योद्धा होता. महाराष्ट्राला आपलं कुटुंब मानणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या या कुटुंबातील तरुणाच्या कुटुंबाची काळजी घेतील का? तसेच सर्वात महत्वाचा मुद्दा, शिक्षणसेवकांना अवघ्या सहा हजारात राबवायचं बंद करुन योग्य वेतन देण्याचा निर्णय होईल का? तसं झालं तर तुषार सारख्या शिक्षण सेवकांना ती खरी श्रद्धांजली ठरेल!
तुषारच्या कर्तृत्वाला सलाम.
(डी.एड.-बी.एड. स्टुडंट असोसिएशनचे राज्य सरचिटणीस आहेत.)
ट्विटर @RamJadh30112459
“या सरकारचे डोखे ठिकाणावर आहे काय..?”
शिक्षणसेवक कोरनाबाधित झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतरांना देखील बाधा होत आहे.यामध्ये संपूर्ण कुटुंब भस्मसात होत आहे.
मेल्यावर शासनाची मदत काय कामी?
जीवंतपणी शिक्षणसेवक नरकयातना भोगत आहेत.समाजाचा अग्रदूत असणाऱ्या शिक्षकाचे हे हाल.
हा सुसंस्कृत समाजरचनेचा अंत आहे काय.
शिक्षकांचा पगार हा सगळ्यांसाठीच चर्चेचा विषय, पण हा पगार त्यांचा अधिकार आहे. शिक्षक होण्यासाठी ज्या दिव्यातून आम्ही सर्व क्षमता सिद्ध केल्या, त्या अशा प्रकारच्या नरकयातना भोगण्यासाठी नाही. क्षमतेनुसार काम आणि कामानुसार मोबदला हा मिळायलाच हवा. हा आमचा संवैधानिक अधिकार आहे.
स्वतःला शिक्षणसम्राट म्हणणाऱ्यांनी शिक्षणाचा बाजार मांडला आहे. याच दलालांनी देणगीच्या नावाखाली बोगस शिक्षक या पवित्र प्रणालीद्वारे आणले आणि हे क्षेत्र मलीन झाले.
बहुजनांच्या उद्धारासाठी शिक्षणाचा मुलमंत्र देणाऱ्या महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे यांच्या विचारांना तीरांजली देऊन “शिक्षणसेवक” कायद्याद्वारे शिक्षणाचे खच्चीकरण करण्याचा कुटील डाव या व्यवस्थेने मांडला .
यामुळे बुद्धिमान तरुणांना शिक्षक या पेशाबद्दल आकर्षण वाटणार नाही आणि समाजाला शिक्षणापासून वंचित राहावे लागेल.
सद्यस्थितीचा विचार करता ६०००₹ एवढ्या तुटपुंज्या माधनावर प्रशिक्षित शिक्षकांना राबविणे हे शासनाला शोभत नाही आणि हा अन्याय सहन करणे आता शक्य नाही, म्हणून आज आम्हाला आमच्याच शासनाला म्हणावे लागत आहे की,
“या सरकारचे डोखे ठिकाणावर आहे काय?”
या आम्हा नवनियुक्त शिक्षकांच्या भावनांना व्यक्त होण्याची संधी मुक्तपीठ ने दिली त्याबद्दल मनःपूर्वक आभार.