Thursday, March 12, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“मोदींनी देशाला ‘चीनचा कचरा, चिंता आणि चिता’ हे तीन ‘चि’ दिले!”: नाना पटोले

युपीएमध्ये नवीन पक्ष आले तर स्वागतच; देशाला वाचवण्याचे काम काँग्रेसच करेल

May 10, 2021
in घडलं-बिघडलं
0
nana patole

मुक्तपीठ टीम

 

भारताला एक समृद्ध राष्ट्र म्हणून उभे करण्यात काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा राहिला आहे. जगात भारत ताठ मानेने उभा राहिला तो पंडित नेहरूंपासून काँग्रेसच्या सरकारांनी केलेल्या विकासकामामुळे. परंतु दुर्दैवाने मागील सात वर्षात देशाच्या लौकीकाला काळीमा फासण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. कोरोनाच्या महामारीत तर मोदी सरकारने देशातील जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले असून त्यांनी जनतेला फक्त ‘चीनचा कचरा, चिंता व चिता’, हे तीन ‘चि’ दिले आहेत, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

 

अ ९ निवासस्थानी माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, कोरोनाची परिस्थीती हाताळण्यात मोदी सरकारला सपशेल अपयश आले आहे, त्यांच्या अहंकारामुळे देशातील जनता होरपळून निघत आहे. सर्वोच्च न्यायालयाला यात हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांनीच टास्क फोर्स नेमला. पंतप्रधान मोदी कोणाचेही ऐकत नाहीत. त्यांनी लसीकरणाचा सावळा गोंधळ करून ठेवला आहे. १३० कोटी जनतेसाठी सरकारने घरोघरी जाऊन मोफत लसीकरण करायला हवे होते पण त्यांनी ते केले नाही. भारतातील लोकसंख्या विचारात घेता ३०० कोटी लसींची आवश्यकता आहे. ती लवकर पुर्ण होणे अवघड आहे. घाईगडबडीत मोदी सरकारने चीनशी काही गुप्त करार केला आहे की काय? अशी शंका उपस्थित होत असून अशा गुप्त करारातून चीनचा कचरा लस म्हणून भारतीय जनतेवर लादतील की काय अशी भीती निर्माण झाली आहे. मोदी सरकारच्या कारभारामुळे लोक भयभीत होऊन जगत आहेत. लोकांची चिंता वाढली असून कोरोनामुळे देशभर चिता जळतानाची विदारक दृश्ये दिसत आहेत.

देशात अन्नधान्याची टंचाई असताना काँग्रेस सरकारांनी हरितक्रांती, श्वेतक्रांती करून देशाला स्वयंपूर्ण बनवले. २००८ च्या जागतिक मंदीचे चटके जग सहन करत असताना देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि लोकांना याची झळ बसू दिली नाही. ज्यांनी अच्छे दिन, विश्वगुरु, महासत्ता बनविण्याचे स्वप्न दाखवले त्यांनी अवघ्या सात वर्षात भूतान आणि रवांडा यासारख्या देशांसमोर मदतीसाठी हात पसरवण्याची वेळ आणली व भारत मातेला छिन्न विछिन्न करण्याचे काम केले. देशाच्या एकता आणि अखंडतेला धोका पोहोचवला आहे. देशाला या संकटातून बाहेर काढून पुन्हा उभे करण्याची क्षमता फक्त काँग्रेसमध्येच आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी काँग्रेस देशाचा आत्मा आहे असे म्हटले आहे त्याच्याशी आम्ही सहमत आहोत, असे नाना पटोले म्हणाले.


Tags: BJPcentral GovernmentCongresscoronanana patoleprime minister narendra modiनाना पटोलेयुपीए
Previous Post

लोककलावंतांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासन सकारात्मक

Next Post

कोविन अॅपवर नोंदणी करून परराज्यातूनही लोक लसीसाठी महाराष्ट्रात

Next Post
balasaheb thorat

कोविन अॅपवर नोंदणी करून परराज्यातूनही लोक लसीसाठी महाराष्ट्रात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!