मुक्तपीठ टीम
भारतात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. या महामारीला रोखण्यासाठी भारतीय नागरिकांचे जलद लसीकरण करणे हाच कोरोनावर मात करण्याचा दीर्घकालीन उपाय असल्याचे जागतिक पातळीवरील तज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांनी म्हटले आहे. तसेच भारताने कोरोना प्रतिबंधिक लसीच्या उत्पादनात वाढ करण्याचा आणि देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्याचाही डॉ. फाऊची यांनी सल्ला दिला आहे. डॉ. अँथनी फाऊची हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे आरोग्य सल्लागार आहेत.
लसीकरण वेगाने करा!
• डॉ.अँथनी फाऊची म्हणाले की, याक्षणी भारतातील कोरोना संपूर्णपणे संपवायचा असेल तर लसीकरण अधिक वेगानं करा.
• भारत हा जगातील सर्वात मोठा लस निर्माता देश आहे.
• जो देशातच नाही तर बाहेरील देशातही लसी उपलब्ध करुन देत आहे.
• त्यामुळे आता भारताच्या कठीण समयी इतर देशांनी भारताच्या मदतीस येऊन त्यांना लसी उपलब्ध करुन द्याव्यात.
डॉ.अँथनी फाऊची यांनी भारताला सुचवलेला अॅक्शन प्लान
• तात्पुरत्या मोठ्या रुग्णालयांची निर्मिती, रस्त्यावर लोक मरु नयेत.
• जलद गतीने लसीकरण, त्यामुळे लोक सुरक्षित होतील.
• देशव्यापी लॉकडाऊन गरजेचे.
• लॉकडाऊनमुळे भारतातील संसर्ग आणि मृत्यूची साखळी तोडण्यास मदत होईल.