मुक्तपीठ टीम
हिंदू विवाह परंपरेत मंगळसूत्राला पवित्र स्थान आहे. लग्नाच्या दिवशी वर वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. मात्र अलिकडेच मुंबईत झालेला एक विवाह खूपच वेगळा ठरला. त्यात मंगळसूत्र फक्त वधूला नाही घातलं गेलं तर तिनं वरालाही मंगळसूत्र घातलं. त्या जोडप्याने एकमेकांना मंगळसूत्र घालून विवाह केल्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीय. समानतेसाठी मंगळसूत्र घालणाऱ्या या वराचे नाव शार्दुल कदम आहे.
शार्दुल आणि तनुजा कॉलेजमध्ये भेटले, मात्र त्यांच्या प्रेमकहाणीची सुरूवात त्यांनी पदवी घेतल्यानंतर चार वर्षांनी सुरू झाली. त्यांचा दोघांचाही संपर्क अगदी वेगळ्या प्रकारे झाला. तिने इन्स्टाग्रामवर हिमेश रेशमियाचे गाणे शेअर केले आणि त्याला कॅप्शन दिले ‘टॉर्चर’. शार्दूलने त्याला रिप्लाय दिला ‘महाटॉर्चर’. त्यातूनच मग दोघांचा संवाद सुरु झाला.
काही दिवसानंतर चहासाठी त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी फेमिनिझमबद्दल बोलणे सुरू केले. त्यावेळेस शार्दुलने स्वतःचे हार्डकोर फेमिनिस्ट म्हणून वर्णन केले. एक वर्षानंतर त्या दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला.
शार्दुलने म्हणतो, ‘फक्त मुलींनी मंगळसूत्र घालायचे? काही अर्थ आहे का? आम्ही दोघेही समान आहोत, त्यानंतर मी जाहीर केले की लग्नाच्या दिवशी मीसुद्धा मंगळसूत्र घालणार.’ तसेच, शार्दूलच्या या निर्णयाला त्याच्या पालकांनी विरोध केला. शार्दुल आपल्या निर्णयावर ठाम होता. शार्दूलचे लग्न व्यवस्थित पार पडले.
इतकेच नाही तर शार्दुलने तनुजाच्या घरातील सदस्यांची भेट घेतली आणि लग्नाचा खर्च मिळून करण्याचे ठरविले. मग लग्नाच्या एक दिवस आधी, तनुजाने शार्दुलला विचारले की, लग्नानंतरही आपण मंगळसूत्र घालणार का, तर शार्दुल म्हणाला की आपण ते करू. अशाप्रकारे त्याचे लग्न पार पडले, परंतु लग्नातले पुरुष नातेवाईक याबाबतीत नाराज होते, पण त्याला काही बोलता आले नाही. पण ही बाब सोशल मीडियावर येताच लोकांनी टोमणे मारण्यास सुरवात केली.
जेव्हा या जोडप्याचा हा ‘मंगळसूत्र सोहळा’ फोटोसह प्रकाशित झाला तेव्हा, तू आता साडीदेखील नेस. तुला मासिक पाळीदेखील येते का? अशा शब्दात शार्दूलला ट्रोल केले जाऊ लागले. मात्र, इन्स्टाग्रामवर त्याच्या बऱ्याच फॉलोवर्सना हा निर्णय आवडला आणि त्यांनी त्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन दर्शविला. इंस्टाग्रामवर शार्दुलच्या पोस्टला ८९,००० हून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.
पाहा व्हिडीओ: