मुक्तपीठ टीम
एखादा माणूस कोरोनातून बरा झाला असेल, तो पुन्हा कोरोना बाधित होऊ शकतो. जगभरात लसीकरण मोहीम सुरु झाली आहे, पण कोणत्याही तज्ज्ञांनी १०० टक्के लसीकरणानंतर पुन्हा बाधित होणार नाही याची हमी दिलेली नाही. त्यामुळे कमालीची काळजी प्रत्येकानेच घेणे आवश्यक आहे. कोरोनामुक्त झालेल्यांना कोरोनापासून दूर राहण्यासाठी दाताच्या डॉक्टरांनी म्हणजेच डेंटिस्टनी दिलेला इशारा खूप महत्वाचा आहे.
त्यामुळे एकदा कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तीने आपल्याला पुन्हा संसर्ग होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी डेंटिस्टनी एक नवा इशारा दिला आहे. त्यांचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे.
डॉ. विजय कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील गोष्टी खूपच महत्वाच्या आहेत:
कोरोनामुक्त झालात? डेंटिस्टचा सल्ला ऐका…
• कोरोनामुक्त झाल्यावर त्वरित टूथ ब्रश आणि टंग क्लिनर बदला
• ब्रश बदलल्यामुळे त्यातून कोरोना संसर्ग होण्याचा धोका टळू शकतो.
• टूथ ब्रशवर अनेकदा जीवाणू आणि विषाणूंची निर्मिती होऊ शकते.
• कोरोना रुग्णांच्या आधीच्या वापरामुळे विषाणू ब्रशवर असू शकतात.
• श्वसन मार्गाच्या वरच्या भागास संसर्ग होण्याची शक्यता असते.
• कोरोनामुक्त झाल्यानंतर ब्रश, टंग क्लिनर बदलल्यास धोका टळतो.