मुक्तपीठ टीम
लॉकडाऊनमध्ये सर्वत्र शांतता असताना या मोराने सकाळी मस्त पिसारा फुलवलाय. सुंदर वातावरण. त्याचं हे नृत्य चाललंय ते चक्क हेलिपॅडवर. जिथं इतरवेळी व्हीआयपी हेलिकॉप्टर्सच्या पंख्यांचा घरघराट ऐकू येतो, तिथेच मनमोहक नृत्यासाठी मोरानं पिसारा फुलवलाय. ही जागा आहे…मुंबईच्या महाराष्ट्र राजभवनातील.
#WATCH | A peacock spreads its wings and dances at Maharashtra Raj Bhavan Helipad In Mumbai.
(Video Source: Maharashtra Raj Bhavan) pic.twitter.com/zfglD7PM8o
— ANI (@ANI) May 6, 2021
मुंबई म्हटले की काहींच्या डोळ्यांसमोर फक्त सिमेंटचं जंगल उभं राहतं. पण जे मुंबई जगतात त्यांना ठाऊक हे की मुंबई हे असं महानगर आहे जे हजारो वर्षांचा इतिहासाचा वारसा जपते आणि त्याचवेळी महानगरातच जंगलांचं नैसर्गिक वैभवही मिरवते. राष्ट्रीय उद्यानाचं भलंमोठं जंगल तर सर्वांनाच ठाऊक आहे, पण एक खासगी छोटं जंगलही मुंबईत आहे. ते दक्षिणमुंबईतील राजभवनात.
त्यामुळेच राजभवनाच्या विस्तीर्ण परिसरात पशू-पक्षी, साप,नाग, अजगर अशांचा राबता असतो. संध्याकाळी राजभवनातील याच जागेवर सर्व’पक्षीय’ सभाही भरते. हा मोर सकाळच्या मस्त प्रसन्न वातावरणात नाचताना दिसला. पाहणाऱ्यांना कोरोनापासून जगातील सर्वच दु:खांचा काही काळ का होईना विसर पडला असेल एवढं नक्की!
पाहा व्हिडीओ: