मुक्तपीठ टीम
सध्या सगळीकडे कोरोना आजाराने थैमान घातले असून रुग्णांना अपुऱ्या ऑक्सिजन सुविधेमुळे हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळण्यास अडचण येत आहे. त्यावेळी मुंबईच्या अंधेरीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष मनीष धुरी यांच्या संकल्पनेतून “मिशन श्वास” ही मोहीम सुरु झाली आहे. आपत्कालीन परिस्थितीत जर कोणास ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता भासल्यास त्यांना तो मनसेमार्फत पुरवला जात आहे.
मनसेच्या ‘मिशन श्वास’चे उदघाटन मनसे सरचिटणीस शालिनी जितेंद्र ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्या म्हणाल्या की, आज कोरोनामुळे महाराष्ट्रात लोकांचे हाल होताना दिसत आहेत. त्यासाठी गेल्या वर्षीपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत, लोकांना मदत करत आहेत. आता कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात रूग्णांची संख्या आज खूप वाढली आहे. या परिस्थित ऑक्सिजन मिळत नाही. ही सर्वात मोठी समस्या आहे त्यासाठी मनसेने विनामूल्य ऑक्सिजनची सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. यावेळी मनसेचे विभाग अध्यक्ष मनिष धुरी, मनविसे उपाध्यक्ष कुशल धुरी,महिला सचिव मीना बन्सल आणि विभागातील महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.
आपत्कालीन परिस्थितीत जर कोणाला ऑक्सिजन सिलिंडरची गरज भासल्यास, कुशल धुरी-९८१९८६६०६६, विजय फडतरे-९८२१५७३१७९, अमोल शेलार-९८१९९५८२१८ या क्रमांकांवर संपर्क साधा.
पाहा व्हिडीओ: