मुक्तपीठ टीम
सुझुकी मोटरसायकल इंडियाने आपल्या लोकप्रिय दोन स्पोर्ट्स बाइक जिग्सर २५० आणि जिग्सर एसएफ २५० या रिकॉल केल्या आहे. रिपोर्टनिसार, या दोन्ही बाइकच्या इंजिनमध्ये वायब्रेशन संबंधित त्रुटी आढळली आहे. या त्रुटीमुळे आता कंपनीने बाइक्सचे एकूण १९९ यूनिट्स परत मागवले आहेत. कंपनी त्रुटी असलेला पार्ट्स मोफतमध्ये बदलून देईल. ज्या बाइक्स कंपनीने परत मागवल्या आहेत, त्यांची निर्मिती ऑगस्ट २०१९ ते मार्च २०२१ या दरम्यान झालेली आहे.
सोसायटी ऑफ इंडिया ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच एसआयएएम इंडियाच्या वॉलंटरी रिकॉल इंफॉर्मेशन पेजवरील माहितीनुसार, बॅलेन्सर ड्राइव्ह गियरसाठी टेम्पलेट मार्किंग मॅचिंगमध्ये गडबड झाल्याने ही समस्या निर्माण झाली. ज्यामुळे बॅलेन्सर ड्राइव्ह गियर इंजिनमध्ये अधिक कंपन निर्माण होऊ लागले.
बाइकच्या किंमती
- दिल्ली एक्सशरूम सुझुकी जिग्सर २५० बाइकची किंमत १,६७,७०० रुपये आहे.
- तर जिगर एसएफ २५० ची किंमत १,७९,२०० रुपये आहे.
- सुझुकीच्या या दोन्ही बाइकमध्ये एकसमान २४९सीसी सिंगल-सिलेंडर ऑइल कूल्ड इंजिन देण्यात आले आहे.
- जे २६ बीएचपीची पॉवर आणि २२.२ एनएमची टॉर्क जनरेट करते.
- हे इंजिन ६-स्पीड गियरबॉक्ससोबत येते.