Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“लातूरमध्ये आयुषच्या डॉक्टरांना एकत्र करुन उभारणार पहिले कोरोना सेंटर”

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुखांची घोषणा

May 4, 2021
in सरकारी बातम्या
0
Amit

मुक्तपीठ टीम

 

देशभरासह राज्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आज ऍलोपॅथीचा प्रामुख्याने उपयोग करण्यात येत आहे. पण येत्या काळात लातूर जिल्ह्यात आयुषच्या सर्व डॉक्टरांना एकत्र करून पहिले कोरोना केअर सेंटर सुरु करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख सांगितले. आयुष टास्कफोर्सचे सदस्य यांच्या समवेत देशमुख यांनी आज ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला.

 

मंत्री देशमुख म्हणाले की, गेल्या जवळपास वर्षभरापासून अधिक काळ कोरोना संकटाशी आपण सामना करत असून अजूनही रुग्णसंख्या आटोक्यात आलेली नाही. यामुळेच कोरोना केअर सेंटरमध्ये आयुष अंतर्गत येणाऱ्या पॅथीचा उपयोग रुग्णांसाठी करून एक पायलट सेंटर लातूरमध्ये सुरु करण्याचा प्रयत्न आहे. सध्याच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या तातडीने कमी करणे आवश्यक आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्यांना आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी मार्फत उपचार देता येऊ शकतात. त्यासाठी एस.ओ.पी.तयार करण्याचे काम आयुष संचालनायामार्फत करण्यात यावे. जेणेकरून राज्यात आयुष संचालनायाअंतर्गत येणाऱ्या डॉक्टरांना या एस.ओ. पी.अंतर्गत कोरोना रुग्णांवर उपचार करता येऊ शकतील. आयुर्वेद आणि उपचार पद्धतींचा उपयोग कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी होऊ शकतो. त्यामुळे ही एस.ओ.पी. वैद्यकीय शिक्षण संचालक आणि आयुष संचालक यांनी तयार करावी.

 

सध्या दिल्ली आणि जयपूरमध्ये कोरोनासाठी आयुर्वेद उपचाराला मान्यता देण्यात आली असल्याने हाच पॅटर्न महाराष्ट्रातही राबविण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करण्यात येईल. यामुळे आयुष डॉक्टरांचे मोठे संख्याबळ उपलब्ध होणार आहे. आयुष अंतर्गत येणाऱ्या पॅथीना उपचारांसाठी परवानगी द्यावी असे केंद्र शासनाकडे पत्र आयुष संचालनायामार्फत देण्यात येईल, असेही देशमुख यांनी सांगितले. येणाऱ्या काळात लातूरमध्ये प्रामुख्याने इंटिग्रेटेड आयुष क्लिनिक सुरु करण्याबाबत विचार असून याबाबतच्या अंमलबजावणीसाठी आयुष संचालयानाने पुढाकार घ्यावा.

देशमुख म्हणाले की, कोरोनासाठी उपचार पद्धती निरनिराळ्या असून ऍलोपॅथी यामध्ये प्रमुख भूमिका निभावत असली तरी अल्टरनेटीव्ह थेरपी निरनिराळ्याअसू शकतात. आयुष संचालनायांतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या पॅथीच्या डॉक्टरांनी या क्षेत्रात काम आणि संशोधन केलेले आहे. त्यामुळे आपल्या संशोधनाच्या कामाचा, ज्ञानाचा उपयोग या काळात करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. येत्या काळात होमिओपॅथिक आयुर्वेदिक, औषधे यांना मान्यता देताना त्यांनी मानके परिपूर्ण केली आहेत का हे तपासून घेणे आवश्यक आहे.

 

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज आयुष टास्क फोर्स सदस्यांसोबत झूम मीटिंगद्वारे चर्चा केली. आजच्या बैठकीत वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, आयुष संचालक डॉ. कुलदीप राज कोहली, डॉ. झुबैर शेख, डॉ. मनीष पाटील, डॉ. जवाहर शाह, डॉ. शुभा राऊळ, डॉ. उर्मिला पिटकर, डॉ. उदय कुलकर्णी, डॉ. मनोज राजा, डॉ. जसवंत पाटील, डॉ. राजश्री कटके, डॉ. संजय लोंढे, डॉ. अमित दवे, डॉ. राजेंद्र निरगुडे, डॉ. नवीन पावस्कर, डॉ. पुरुषोत्तम लोहिया, डॉ. हरीश बी सिंग, जयंत वकनाली आदी उपस्थित होते.


Tags: Amit deshamukhlaturअमित देशमुखअल्टरनेटीव्ह थेरपीआयुष क्लिनिकआयुष टास्क फोर्सडॉ. तात्याराव लहाने
Previous Post

“मिशन ऑक्सिजन स्वावलंबन, कोरोना केंद्रांची संख्याही वाढवणार!” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

डॉक्टर, शास्त्रज्ञ,उद्योजक एकवटले, स्वस्त देशी व्हेंटिलेटर बनवले!

Next Post
oxygen

डॉक्टर, शास्त्रज्ञ,उद्योजक एकवटले, स्वस्त देशी व्हेंटिलेटर बनवले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!