मुक्तपीठ टीम
डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये स्टेनोग्राफर ग्रेड-२ या पदासाठी ४ जागा, निम्न श्रेणी लिपिक या पदासाठी १० जागा, सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (सामान्य ग्रेड) या पदासाठी ७ जागा, सुखानी या पदासाठी १ जागा, कारपेंटर या पदासाठी १ जागा, मल्टी टास्किंग स्टाफ (ऑफिस अॅन्ड ट्रेनिंग) या पदासाठी ६० जागा अशा एकूण ८३ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २२ मे २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १) १२वी उत्तीर्ण २) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: १० मिनिटे @ ८० श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर ५० मिनिटे (इंग्रजी), ६५ मिनिटे (हिंदी).
२) पद क्र.२- १) १२वी उत्तीर्ण २) कौशल्य चाचणी: संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.
३) पद क्र.३- १) १० वी उत्तीर्ण २) अवजड वाहन चालक परवाना ३) २ वर्षे अनुभव
४) पद क्र.४- १) १२वी उत्तीर्ण २) जलतरण प्रमाणपत्र ३) २ वर्षे अनुभव
५) पद क्र.५- १) १२वी उत्तीर्ण/ आयटीआय २) २ वर्षे अनुभव
६) पद क्र.६- १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र.१ ते ३ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षे, पद क्र.४ ते ६ साठी १८ ते २५ वर्षे असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज पाठविणारा पत्ता: कमांडंट, डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन (नीलगिरी) – ६४३२३१ तामिळनाडू
अधिक माहितीसाठी
संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयाच्या अधिकृत वेबसाइट http://dssc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: