मुक्तपीठ टीम
सध्या कोरोनाची परिस्थिती गंभीर असताना, स्वत:ची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. घशाचे संरक्षण करण्याकरिता कोमट पाण्याचे सेवनही महत्त्वाचे आहे. घशात काहीही त्रास होत असेल, तसेच ताप किंवा सर्दीच्या नेहमीच्या विषाणूंमुळे घसा खवखवत असेल तर कोमट पाणी उपयोगी ठरते. घशाचा संसर्ग बॅक्टेरियामुळेही होतो. त्यासाठीही कोमट पाणी प्रभावी ठरते.
कोरोना संकटात घसा दुखला की भीती वाटतेच. त्यावेळी सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या. मात्र, त्याचवेळी तुम्ही घशासाठी काही सोपे उपाय करू शकता. डॉक्टरांनी सांगितलेले उपाय करतानाच काही घरगुती उपाय आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत.
१. भरपूर पाणी प्या, ते डिहायड्रेशन टाळेल, घसा ओलसर राहील.
२. कोमट पाणी, सूप किंवा चहासारखे पेय घेऊ शकता
३. गरम पाणी आणि चहा श्वसनमार्गास उबदार ठेवतो
४. घशात, वरच्या श्वसनमार्गामध्ये जमा होणारा कफ बाहेर येण्यास मदत होईल
५. शक्यतो हा त्रास होत असताना कोमट पाण्याने आंघोळ करा
६. अल्कोहोल किंवा कॉफी पिणे टाळावे. यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते
७. एक कप पाण्यात अर्धा चमचे मीठ घालून गुळणी करा
८. गुळणी केल्याने, घशातील संसर्ग कमी होण्यास मदत होते
९. वाफ घेतल्याने घशाचा त्रास कमी होईल. श्वास घेणे सोपे जाईल
१०. कोणताही उपाय करताना नेहमी आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पाहा व्हिडीओ: