मुक्तपीठ टीम
देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने दररोज हजारो नागरिकांना प्राण गमावावे लागत आहे. या सर्व परिस्थितीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यासह केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे .
संदीप देशपांडे यांचे ट्वीट
“लसीकरण आहे पण लस नाही. खाटा आहेत पण ऑक्सिजन नाही, उपचार आहे पण औषध नाही, व्यापारी आहे पण व्यापार नाही, लोक आहेत पण नोकरी नाही, मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, सगळंच रामभरोसे आहे पण त्यात काहीच राम नाही,” अशी खोचक टीका संदीप देशपांडेंनी ट्वीटच्या माध्यमातून केली आहे.
लसीकरण आहे पण लस नाही. खाटा आहेत पण ऑक्सिजन नाही, उपचार आहे पण औषध नाही, व्यापारी आहे पण व्यापार नाही, लोक आहेत पण नोकरी नाही, मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, सगळंच रामभरोसे आहे पण त्यात काहीच राम नाही
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 4, 2021