मुक्तपीठ टीम
सॅमसंगच्या नवीन फोल्डेबल फोन लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. त्या मॉडेलशीसंबंधित डिटेल्स समोर येत आहेत. गॅलेक्सी झेड फोल्ड ३ स्मार्टफोनला गॅलेक्सी झेड फोल्ड २ च्या तुलनेत बर्याच फिचर्ससह अपग्रेड केले आहे. टेक वेबसाइट गिझमोचीननुसार, सॅमसंगच्या नवीन फोल्डेबल फोनमध्ये नवीन रियर कॅमेरा डिझाइन देण्यात येईल. लीक झालेल्या फोटोंवरून असे दिसते की फोनमध्ये तीन कॅमेरा सेन्सर आणि एक एलईडी फ्लॅश आहे.
नव्या फोल्डेबल फोनमध्ये कोणते फिचर्स?
• फोल्डेबल फोन गॅलेक्सी नोट सिरीज प्रमाणे एस पेन सपोर्ट मिळू शकेल.
• गॅलेक्सी झेड फोल्ड ३ मध्ये व्हिडीओ कॉल करतांना एस-पेनच्या साह्याने नोट्स लिहिण्याची सुविधा युजर्सना दिली जाईल.
• एस पेनसाठी फोल्डेबल फोनमध्ये वेगळे स्लॉट असणार आहे.
• पेन फोनसह येईल किंवा वेगळे खरेदी करावा लागेल, हे स्पष्ट नाही.
• सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ३ हा जगातील पहिला फोल्डेबल स्मार्टफोन असेल, ज्यामध्ये अंडर-डिस्प्ले कॅमेरा असेल.
• जुन्या मॉडेलपेक्षा त्याला स्क्रीन-टू-बॉडी रेशो जास्त मिळेल.
• बाहेरून डिव्हाइसच्या संरक्षणासाठी गोरिला ग्लास विक्टस मिळण्याची शक्यता आहे.
इन-स्क्रीन कॅमेरा आणि एस पेन स्टाईलस सारख्या नवीन फिचर्स मुळे सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ३ महागड्या प्राईज टॅगसह येऊ शकतो. कंपनीने अद्याप झेड फोल्ड ३ ची अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. मात्र, जुलैमध्ये गॅलेक्सी झेड फ्लिप ३ सोबत कंपनी थर्ड जनरेशन फोल्डेबल फोनची घोषणा करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.