मुक्तपीठ टीम
ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेडमध्ये इन्वेस्टिगेटर या पदासाठी ३५० जागा, सुपरवायझर या पदासाठी १४५ जागा, सिस्टम एनालिस्ट या पदासाठी २ जागा, सिनियर डोमेन एक्सपर्ट या पदासाठी १९ जागा, ज्युनियर डोमेन एक्सपर्ट या पदासाठी २५ जागा, मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) या पदासाठी १६ जागा, सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट (एसएमइ) या पदासाठी ५ जागा, यंग प्रोफेशनल्स या पदासाठी ५ जागा अशा एकूण ५६७ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १० मे २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १) पदवीधर २) संगणक ज्ञान
२) पद क्र.२- १) पदवीधर २) संगणक ज्ञान ३) २ वर्षे अनुभव
३) पद क्र.३- १) बी.इ/ एम.इ (कॉम्पुटर/ आयटी) / एमसीए/ एम.टेक (कॉम्पुटर सायन्स) २) ८ वर्षे अनुभव
४) पद क्र.४- अर्थशास्त्र / उपयोजित अर्थशास्त्र / व्यवसाय अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स या विषयातील म्हणून पदव्युत्तर पदवी किंवा सांख्यिकी / गणित / वाणिज्य पदव्युत्तर पदवी + १५ वर्षे अनुभव किंवा सेवानिवृत्त आयइएस/ आयएसएश/ सर्वेक्षण संचालनालयात काम करणारे कमीतकमी संचालक आणि ५ वर्षांचा अनुभव असलेले राज्य डीइएस अधिकारी
५) पद क्र.५- अर्थशास्त्र / उपयोजित अर्थशास्त्र / व्यवसाय अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स या विषयातील म्हणून पदव्युत्तर पदवी किंवा सांख्यिकी / गणित / वाणिज्य पदव्युत्तर पदवी + ८ वर्षे अनुभव किंवा सेवानिवृत्त आयईएस / आयएसएस / किमान डीवाय पातळीवरील डीईएसचे अधिकारी. संचालक आणि सर्वेक्षण संस्थेमध्ये काम करण्याचा ३ वर्षांचा अनुभव.
६) पद क्र.६- १० वी उत्तीर्ण
७) पद क्र.७- सांख्यिकी किंवा अर्थशास्त्र किंवा डेटा विज्ञान प्रथम श्रेणी-पदव्युत्तर पदवी + २० वर्षे अनुभव किंवा कमीतकमी डीडीजी पातळीवरील सेवानिवृत्त आयईएस / आयएसएस अधिकारी किंवा राज्य डीईएस / बीएईएसचे सेवानिवृत्त संचालक
८) पद क्र.८- सांख्यिकी किंवा अर्थशास्त्र / उपयोजित अर्थशास्त्र किंवा संगणक अनुप्रयोगात किंवा सामाजिक विज्ञानात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र.१ आणि ८ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ४५ वर्षांपर्यंत, पद क्र.२ ते ५ साठी ५० वर्षांपर्यंत, पद क्र.६ साठी ६० वर्षांपर्यंत, पद क्र.७ साठी ४० वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ९५५ रुपये तर, एससी/ एसटी/ पीएच/ इडब्ल्यूएस उमेदवारांकडून ६७० रुपये शुल्क आकारले जाईल.
अधिक माहितीसाठी
ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.becil.com/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: