मुक्तपीठ टीम
भारतीय विमा नियामक आणि विमा प्राधिकरणाने (आयआरडीएआय) विमा कंपन्यांना कोरोनाच्या उपचारासाठी कॅशलेस विमा दाव्यांवर अंतिम बिल मिळाण्याच्या १ तासाच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाला लवकरच बेड मिळेल. आयआरडीएआयने सर्व सामान्य विमा आणि आरोग्य विमा कंपन्यांना कोरोना साथीच्या रोगाशी संबंधित कॅशलेस उपचारांसाठी रुग्णालयाच्या आवश्यक असलेल्या सर्व गरजा पूर्ण करण्याच्या १ तासाच्या आत विमा दाव्यांबद्दल ऑथोरायझेशनची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जारी करण्यात आली मार्गदर्शक सूचना
- विशेष म्हणजे, दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे लक्ष देऊन आयआरडीएने ही मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.
- दिल्ली उच्च न्यायालयाने आयआरडीएला विमा कंपन्यांना जास्तीत जास्त ३० ते ६० मिनिटांच्या कालावधीत कॅशलेस मंजूरीबद्दल सूचित करण्यास सांगितले होते जेणेकरुन रुग्णांना डिस्चार्ज मिळण्यास विलंब होऊ नये.
- कोरोनाची दुसरी लाट आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करीत आयआरडीएआयने विमा कंपन्यांना कठोर निर्देश दिले आहे की, त्यांना कोरोना संबंधित विमा दाव्यांच्या बाबतीत रुग्णालयातून अंतिम बिल मिळण्याच्या आणि आवश्यक बाबींची पूर्तता केल्याच्या, एका तासाच्या आत दाव्यांसंदर्भात त्यांच्या निर्णयाबद्दल नेटवर्क प्रदात्यास माहिती देणे आवश्यक आहे.
विमा कंपन्यांनी अंतिम मुदतीची वाट पाहू नये
- आयआरडीएआयच्या परिपत्रकात विमा कंपन्यांना निर्देश देण्यात आले आहेत की अंतिम मुदतीची प्रतीक्षा करू नये आणि लवकरात लवकर रूग्णांवर कॅशलेस उपचार अधिकृत केले जावेत व परवानगी मिळावी यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया लवकर करावी.
- विमा कंपन्यांना नियमांचे वेळेवर पालन होण्याकरिता संबंधित तृतीय पक्षाच्या प्रशासकांना योग्य मार्गदर्शक सूचना जारी करण्यास सांगितले आहे.