मुक्तपीठ टीम
नव्या आर्थिक वर्षातील पहिला महिना एक मे पासून अनेक नियम बदलणार आहेत. यामध्ये बँकिंग, एलपीजी सिलिंडरची किंमत, कोरोना लसीकरण यांचा समावेश आहे. या बदलांचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशाला बसणार आहे.
१. १८ वर्षांवरील लोकांचे लसीकरण
- कोरोनाची दुसरी लाट पाहता लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मेपासून सुरू होईल.
- यात १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लस दिली जाईल.
- लसीकरण मोहिमेच्या या टप्प्यात सरकारने अनेक नियम बदलले आहेत.
- यावेळी सरकारने ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया अनिवार्य केली आहे.
- महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये लस उपलब्ध नसल्यमुळे युवा वर्गाचे एक मे पासून लसीकरण सुरु केले जाणार नाही.
२. गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल होणार
- सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल करतात.
- गॅस सिलिंडरच्या नवीन किंमतीही १ मे रोजी जाहीर केल्या जातील.
- किंमती एकतर वाढतील किंवा कमी होतील.
३. आयआरडीएने पॉलिसीची कव्हर रक्कम दुप्पट केली
• विमा नियामक प्राधिकरण आयआरडीएने आरोग्य संजीवनी पॉलिसीची कव्हर रक्कम दुप्पट केली आहे.
• विमा कंपन्यांना १ मे पर्यंत १० लाख रुपयांपर्यंत कव्हर देणारी पॉलिसी ऑफर करावी लागेल.
• आरोग्य संजीवनी मानक धोरणाची गेल्यावर्षी १ एप्रिलपासून कव्हरेज मर्यादा केवळ ५ लाख रुपये होती.
४. बारा दिवस बँका बंद
• मे महिन्यात बँका एकूण १२ दिवस बंद राहणार आहेत.
• मात्र, यापैकी काही दिवस असेही असतील की तेव्हा काही राज्यातच बँका बंद राहतील.
• आरबीआयच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या सुट्टीच्या यादीमध्ये काही सुट्टी अशा असतात त्या स्थानिक राज्य पातळीवरील आहेत.
५.अॅक्सिस बँकेच्या सेवा शुल्कांमध्ये बदल होणार
• अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांना १ मे पासून फ्रि लिमीटनंतर एटीएममधून कॅश काढल्यास सध्याच्या तुलनेत तुम्हाला दुप्पट शुल्क भरावे लागेल.
• या व्यतिरिक्त बँकेने यापूर्वीच इतर सेवांसाठी शुल्क वाढविले आहे.
• अॅक्सिस बँकेच्या सुलभ बचत योजना असलेल्या खात्यासाठी किमान शिल्लक रक्कम १०,००० रुपयांवरून १५,००० रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
६. अॅक्सिस बँकेच्या एसएमएस अलर्टसाठी शुल्क
• १ जुलै २०२१ पासून अॅक्सिस बँक एसएमएस अलर्टसाठी शुल्क वाढवणार आहे.
• बँकेच्या वेबसाइटनुसार सध्या निवडलेल्या व्हॅल्यू अॅडेड सर्व्हिसेस अलर्टसाठी सबस्क्रिप्शन बेसवर एसएमएस शुल्क दरमहा ५ रुपये आहे.
• परंतु १ जुलै २०२१ एक्सिस बँकेकडून प्रति एसएमएसवर २५ पैसे आकारले जाणार आहेत.
• मात्र, ओटीपी आणि बँकेने पाठवलेल्या प्रमोशनल एसएमएसवर चार्जेस नसतील.
• ही खाती एसएमएसच्या वाढीव शुल्काच्या व्याप्तीच्या बाहेर असतील – बरगंडी, बरगंडी खासगी, प्राधान्य, एनआरआय, ट्रस्ट आणि सरकारी खाती, संरक्षण वेतन खाती, कर्मचारी खाती, छोटी आणि मूलभूत खाती, निवृत्तीवेतन खाती आणि निवडक पगार संबंध खाती.
७. अॅक्सिस बँकेचे डॉरमेंट सॅलरी खात्यांच्या बाबतीत शुल्क
• अॅक्सिस बँकेने सॅलरी अकाऊंटचे नियमही बदलले आहेत.
• जर सॅलरी अकाऊंट ६ महिन्यांपेक्षा जास्त जुनं आहे आणि कोणत्याही १ महिन्यात पगार क्रेडिट नसेल तर दर महिना १०० रुपये शुल्क आकारलं जाईल.
• त्याबरोबर जर आपल्या खात्यात १७ महिन्यांपर्यंत ट्रान्झॅक्शन झालं नसेल तर १८ व्या महिन्यात १०० रुपये शुल्क आकारले जाईल.
• अॅक्सिस बँकेने स्वाक्षरी पडताळणी, फोटो पडताळणी, चेक चे स्टॉप पेमेंट, पत्त्याची पुष्टीकरण इत्यादी सेवांसाठी शुल्क कमी केले आहेत.
• नवीन शुल्क १ मे २०२१ पासून लागू होईल.