मुक्तपीठ टीम
अनेकदा संकट आले की आपल्यांपुरतंच पाहिलं जातं. त्यातही कोरोना तर असं संकट आहे की भलेभले फक्त स्वत:पुरतंच पाहू लागलेत. त्याचवेळी समाजातील एक मोठा वर्ग असाही आहे की जो समाजातील दुर्लक्षित घटकांसाठीही मायेचा आधार ठरतो आहे.
महाराष्ट्रात कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्याच्या उद्देशाने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे दुकाने, व्यवसाय, काम धंदे सारेच बंद असल्याने अनेकांच्या कमाईचे मार्गच बंद आहेत. त्यातही तृतीयपंथीयांच्या कमाईचा मार्ग पूर्णतः बंद आहे. समाजातील हा घटक तसा दुर्लक्षितच. त्यामुळे कुणाचेही त्यांच्याकडे लक्षही गेले नाही. त्यांच्या पोटापाण्यासाठी सरकारने विशेष तरतूद केल्याचेही दिसत नाही. त्यामुळेच मनसे पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय श्रुंगारपुरे यांनी तृतीयपंथीयांना मदतीचा आधार दिला आहे. मनसे पर्यावरण सेनेच्यावतीने मुंबईत तृतीयपंथी समाजातील अनेक गरजूंना मोफत धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
मनसे पर्यावरण सेनेच्या या माणुसकीचा आधार देणाऱ्या उपक्रमात मनसे पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे यांच्यासह सरचिटणीस निनाद आवळे, खजिनदार सत्यजीत गायकवाड, तेजस पटेल, ईश्वर सुरडकर आणि मार्शल फर्नांडिस सहभागी झाले होते.
पाहा व्हिडीओ: