मुक्तपीठ टीम
भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कलमध्ये जीडीएस-ब्रांच पोस्ट मास्टर (बीपीएम), जीडीएस-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (एबीपीएम), जीडीएस-डाक सेवक या पदांसाठी एकूण २,४२८ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २६ मे २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) १०वी उत्तीर्ण २) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ इडब्ल्यूएस उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाईल तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
भारतीय डाक महाराष्ट्र सर्कलच्या अधिकृत वेबसाइट https://maharashtrapost.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.