मुक्तपीठ टीम
सर्वसामान्य जनतेला शासनाच्या नियमानुसार कोरोनापासून बचाव करणारी लस वेळीच दिल्यास नागरिकांना दिलासा मिळेल या हेतूने जोगेश्वरी विधासभा क्षेत्राचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधानसभा क्षेत्रातील ‘मातोश्री आर्टस आणि स्पोर्टस ट्रस्ट’ तसेच ‘बाल विकास विद्या मंदिर’ येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याची सूचना केली आहे. या सुचनेला मनपाच्या के पूर्व विभागाने अनुकुलता दर्शवली आहे. त्यामुळे लवकरच या दोन्ही ठिकाणी मनपामार्फत लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असला तरी तो पूर्ण नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या महामारीपासून राज्य शासन व प्रशासनातील विविध यंत्रणा नागरिकांचा या महामारीपासून बचाव करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. कोरोना लसीकरण मोहीम ही शासन आणि प्रशासनाच्या रुग्णालयात तसेच विविध लसीकरण केंद्रात सुरू आहे. ज्या ज्या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे त्या सर्व ठिकाणी लस घेण्यासाठी जनतेची मोठ्याप्रमाणात गर्दी होत आहे.
जनतेची वाढती गर्दी लक्षात घेता केंद्राची संख्या वाढून या लसीकरणाचा लाभ वेळीच जास्तीत जास्त नागरिकांना मिळावा या हेतूने जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील ‘मातोश्री आर्टस आणि स्पोर्टस ट्रस्ट’ व ‘बाल विकास विद्या मंदिर’ या दोन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, असे पत्र आमदार रविंद्र वायकर यांनी सहाय्यक आयुक्त, के पूर्व यांना दिले होते. या पत्रानुसार के पूर्वचे वैद्यकीय अधिकारी, परिरक्षण विभागाचे अधिकारी, नगरसेवक बाळा नर यांनी या दोन्ही जागांची पहाणी केली. ही केंद्रं सुरू करण्यासाठी आवश्यक लसीकरण कक्ष, प्रतिक्षा कक्ष, निरीक्षक कक्ष, नोंदणी करीता आवश्यक जागा या ठिकाणी उपलब्ध असल्याने या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी अनुकुलता दर्शवली असल्याचे पत्र दिनांक २४ एप्रिल रोजी आमदार यांना पाठविले आहे. त्यामुळे या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून लवकरच लसीकेंद्र सुरू करण्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या अगोदर ‘मातोश्री आर्टस आणि स्पोर्टस ट्रस्ट’ येथे मनपामाफॅत तात्पुरते कोरोना सेंटर सुरू करण्याची सुचनाही वायकर यांनी पत्राद्वारे मनपा आयुक्तांना केली आहे. नगरसेवक बाळा नर यांनीही लसीकरण केंद्र सुरु करण्यासाठी सहाय्यक आयुक्त, के पूर्व यांना पत्र दिले होते.