मुक्तपीठ टीम
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉपोर्रेशन ऑफ इंडियात लिमिटेडमध्ये ज्युनियर मॅनेजर (सिव्हिल) या पदासाठी ३१ जागा, ज्युनियर मॅनेजर (ऑपरेशन्स अॅन्ड बीडी) या पदासाठी ७७ जागा, ज्युनियर मॅनेजर (मेकॅनिकल) या पदासाठी ३ जागा, एक्झिक्युटिव (सिव्हिल) या पदासाठी ७३ जागा, एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) या पदासाठी ४२ जागा, एक्झिक्युटिव (सिग्नल अॅन्ड टेलिकम्युनिकेशन) या पदासाठी ८७ जागा, एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स अॅन्ड) या पदासाठी २३७ जागा, एक्झिक्युटिव (मेकॅनिकल) या पदासाठी ३ जागा, ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) या पदासाठी १३५ जागा, ज्युनियर एक्झिक्युटिव (सिग्नल अॅन्ड टेलिकम्युनिकेशन) या पदासाठी १४७ जागा, ज्युनियर एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स अॅन्ड बीडी) या पदासाठी २२५ जागा, ज्युनियर एक्झिक्युटिव (मेकॅनिकल) या पदासाठी १४ जागा अशा एकूण १०७४ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २३ मे २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
२) पद क्र.२- ६०% गुणांसह एमबीए/ पीजीडीबीए/ पीजीडीबीएम/ पीजीडीएम (मार्केटिंग/बिजनेस ऑपरेशन/कस्टमर रिलेशन/फायनान्स)
३) पद क्र.३- ६०% गुणांसह मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/ मेकाट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल/प्रोडक्शन/ ऑटोमोबाईल/उत्पादन/इन्स्ट्रुमेंटेशन अॅन्ड कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कम्युनिकेशन्स इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी
४) पद क्र.४- ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य
५) पद क्र.५- ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सप्लाई / इन्स्ट्रुमेंटेशन अॅन्ड कंट्रोल/ इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स /डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
६) पद क्र.६- ६०% गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा.
७) पद क्र.७- ६०% गुणांसह पदवीधर
८) पद क्र.८- ६०% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / उत्पादन / मेकाट्रॉनिक्स / प्रोडक्शन / ऑटोमोबाईल / इंस्ट्रुमेंटेशन अॅन्ड कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
९) पद क्र.९- ६०% गुणांसह १०वी उत्तीर्ण २) ६०% गुणांसह आयटीआय (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिशियन/वायरमन/इलेक्ट्रॉनिक्स)
१०) पद क्र.१०- १) ६०% गुणांसह १०वी उत्तीर्ण २) ६०% गुणांसह आयटीआय (इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / आयटी / टीव्ही अॅन्ड रेडिओ / इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स / डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स /कॉम्प्युटर / कॉम्प्युटर नेटवर्किंग / डेटा नेटवर्किंग)
११) पद क्र.११- ६०% गुणांसह १०वी उत्तीर्ण + ६०% गुणांसह आयटीआय किंवा कोणत्याही शाखेतील पदवी.
१२) पद क्र.१२- १) ६०% गुणांसह १०वी उत्तीर्ण २) ६०% गुणांसह आयटीआय (फिटर / इलेक्ट्रिशियन / मोटर मेकॅनिक / इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड इन्स्ट्रुमेंटेशन)
असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र.१ ते ३ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षे, तर पद क्र.४ ते ८ साठी १८ ते ३० वर्षे, पद क्र.९ ते १२ साठी १८ ते ३० वर्षे असावे.
शुल्क
पद क्र.१ ते ३ साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ इडब्ल्यूएस उमेदवारांकडून १००० रूपये शुल्क, पद क्र.४ ते ८ साठी जनरल/ ओबीसी/ इडब्ल्यूएस उमेदवारांकडून ९०० रूपये, पद क्र.९ ते १२ साठी जनरल/ ओबीसी/ इडब्ल्यूएस उमेदवारांकडून ७०० रूपये शुल्क आकारले जाईल.
अधिक माहितीसाठी
डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://dfccil.com/ वरून माहिती मिळवू शकता.