मुक्तपीठ टीम
देशात उफाळलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या महालाटेमुळे रोज लाखो नवे भारतीय कोरोनाग्रस्त होत आहेत. त्यांच्यापैकी बरेच असे आहेत की ज्यांना सौम्य लक्षणांमुळे विलगीकरण सांगितले तर कोणीही त्यांच्यासाठी अन्नाचीही सोय करणारे नसते. अशांसाठी दिल्लीतील बंगला साहिब गुरुद्वाराने आपली लंगर सेवा सुरू केली आहे. या सेवेमार्फत अशा गरजू लोकांना घरपोच भोजन पुरवले जात आहे.
बंगला साहिब गुरुद्वारात नेहमीच लंगर असते. पण आता गुरुद्वाराने वेगळं पाऊल उचलले आहे. विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या कोरोना रूग्णांसाठी ताजे भोजन तयार करुन पॅक करुन त्यांच्या घरांमध्ये पोचविले जात आहे. दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने ही लंगर सेवा सुरू केली आहे. जेथे आवश्यकता आहे तेथे अन्न पुरवण्याचे काम करू, असे गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने जाहीर केले आहे.
कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या या भीषण परिस्थितीच्या वेळी बंगला साहिब गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीने सुरु केलेल्या घरपोच लंगर सेवेची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
पाहा व्हिडीओ: