मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या पहिल्या लाटेत स्थलांतरीत मजुरांच्या मदतीसाठी धावलेल्या अभिनेता सोनू सुदने आपली प्रतिमा महासंकटातील महानायकाची बनवली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही सोनूनं आपला सामाजिक वसा कायम ठेवला आहे. सध्या कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे उपचारासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे सोनुने टेलीग्राम अॅपवर ‘इंडियाज फाइट अगेंस्ट कोरोना’ हे चॅनल लाँच करून कोरोना रुग्णांच्या सहकार्यासाठी बांधणी करणे सुरु केले आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून गरजूंना रूग्णालयात गरजूंना बेड्स, औषधे आणि ऑक्सिजन उपलब्ध केली जातील. विशेष म्हणजे, अलिकडेच सोनू सूदला कोरोनाची लागण झाली होती. त्यातून सावरताच सोनूने गरजू कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी हे पाऊल उचलले आहे.
अब पूरा देश साथ आएगा।
जुड़िए मेरे साथ Telegram चैनल पे
“India Fights With Covid “ पर
हाथ से हाथ मिलाएँगे .. देश को बचाएँगेhttps://t.co/Qa5nxskuqk pic.twitter.com/UPzNuufYjA
— sonu sood (@SonuSood) April 24, 2021
देशभरातील कोरोना रूग्णांच्या मोठ्या वाढीमुळे रुग्णालयांवर अतिरिक्त दबाव आला आहे. यामुळे रुग्णालयांमध्ये बेडची व्यवस्था अपुरी पडत आहे. कोरोना उपचारात सर्वात महत्व आहे ते ऑक्सिजनला. मात्र, ऑक्सिजन कमी पडत असल्याने आवश्यकतेनुसार ऑक्सिजन सिलिंडरही मिळत नाहीत. अनेकांचे नाहक बळी जात आहेत. तसेच औषधांचीही कमतरता भासत आहे. या परिस्थितीत गरजूंना मदत करण्यासाठी सोनूने टेलीग्राम अॅपचा मार्ग स्वीकारलाय.
सोनूचा पुढाकार असलेल्या इंडिया अगेंस्ट कोरोना या टेलीग्राम चॅनलद्वारे लोक एकमेकांच्या मदतीने उपचारासाठी आवश्यक वस्तू मिळवू शकतील. सोनूने ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे, सोनूने लिहिले की, ‘आता संपूर्ण देश एकत्र येईल. सामील व्हा माझ्यासोबत टेलीग्राम चॅनेलवर इंडिया फाइट अगेंस्ट कोरोनावर हात मिळवूया.. देशाला वाचवूया.’ हे चॅनेल गरजू लोकांना ऑक्सिजन, बेड आणि औषधे उपलब्ध करून देईल.
पाहा व्हिडीओ: