Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऑक्सिजनसाठी घरातील एलपीजी सिलिंडरच्या पर्यायावर विचार…टाटांच्या तज्ज्ञांनी सुचवला जुगाड!

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
tata

अपेक्षा सकपाळ/मुक्तपीठ टीम

 

देशात कोरोनाचा उद्रेक वाढत असतानाच ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रोज अनेकांना प्राण गमवावे लागल्याच्या बातम्याही हादरवून जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता सरकारच्या प्रयत्नांनी रेल्वे, हवाईमार्गे जरी ऑक्सिजन आणला तरी तो रुग्णांपर्यंत पोहचवणे सोप नाही. कारण देशात ऑक्सिजन सिलिंडरचाही तुटवडा आहे. त्यामुळेच टाटा कंसल्टिंग इंजिनीअर्सच्या तज्ज्ञांनी सहज सोपा असा एक जुगाड सुचवला आहे. त्यांनी सुचवलेल्या पर्यायांनुसार, आपल्या घरातील एलपीजी सिलिंडर, फायर एक्स्टिंग्युंशर, मोठे सीएनजी सिलिंडर यांचाही ऑक्सिजन रुग्णांना देण्यासाठी वापर होऊ शकतो. त्यासाठी फक्त काही नोजल व्हॉल्व्हमध्ये बदल आणि स्वच्छ करण्याची काळजी घ्यावी लागेल.

 

मुक्तपीठशी बोलताना टाटा कंन्सल्टंसी इंजिनीअर्सच्या संशोधनात सहभागी सदस्यांनी महत्वाची माहिती दिली. खऱ्या अर्थानं आऊट ऑफ बॉक्स विचार करत, पण साधे सोपे पर्याय त्यांनी सुचवल्याचं स्पष्ट झालं आहे.

 

कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन अत्यावश्यक

  • कोरोना रुग्णांचे मृत्यू टाळण्यासाठी श्वासोच्छवासाच्या समस्येपासून त्यांना वाचवणे आवश्यक असते.
  • त्यासाठी त्यांना बाहेरून जास्त दाबाने ऑक्सिजन पुरवावा लागतो.
  • त्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन सिलिंडर्स आवश्यक असतात. परंतु देशात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे.

 

टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्सचा वैज्ञानिक जुगाड:

  • टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्सच्या टीमने मेडिकल ऑक्सिजन पुरवठा आणि ऑक्सिजन जनरेशनच्या पर्यायी पद्धतीसाठी तीन पर्याय सुचवले आहेत. इमरजेंसी ऑप्शन्स म्हणून मेडिकल ऑक्सिजनच्या वापरासाठी हे तीन पर्याय आहेत.
  • सीओ २ अग्निशामक यंत्र म्हणजेच घर, दुकान, कारखान्यातील फायर एक्स्टिंग्युशरचा ऑक्सिजन सिलिंडर म्हणून वापर. त्यात किमान १२ तास राहिल एवढा ऑक्सिजन ठेवता येईल. त्यासाठी आधी आवश्यक स्वच्छता आणि नोजल व्हॉल्व्ह बदलण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
  • घरातील एलपीजी सिलिंडर्सही ऑक्सिजन सिलिंडर म्हणून वापरता येतील. त्यासाठी आधी आवश्यक स्वच्छता आणि नोजल व्हॉल्व्ह बदलण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
  • सीएनजीसाठी वापरले जाणारे मोठे सिलिंडरही ऑक्सिजन सिलिंडर म्हणून वापरता येतील. त्यासाठीही आधी आवश्यक स्वच्छता आणि नोजल व्हॉल्व्ह बदलण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
  • टाटा कन्सल्टंसी इंजिनीअर्सच्या टीमने या तीन प्रकारचे गॅस साठवणाऱ्या सिलिंडर्सची दबाव क्षमता, मटेरिअलची क्षमता तपासली आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरमध्ये गॅस स्वरुपात आणि इतर दोन सिलिंडरमध्ये द्रव स्वरुपात ऑक्सिजन योग्य दबावाखाली भरता येईल.
  • किमान १२ ते ५० तास असे त्यांच्या क्षमतेनुसार ते रुग्णांसाठी वापरता येतील.

tata (1)tata (2)

काय काळजी घ्यावी?

  • घरातील गॅस सिलिंडरमध्ये एलपीजी असतो, फायर एक्स्टिंग्युशरमध्ये कार्बन डाय ऑक्साइड असतो तसेच सीएनजी सिलिंडरमध्ये सीएनजी असतो. ते मानवी शरीरासाठी योग्य नाहीत. त्यामुळे ऑक्सिजनसाठी वापर करण्यापूर्वी त्यांच्यासाठी वापरत असलेल्या सिलिंडरची स्वच्छता करून त्यांच्यात आधीच्या वायूचे कोणतेही अवशेष राहणार नाहीत, अशी काळजी घ्यावी लागेल.
  • तसेच या तीन साधनांचे व्हॉल्व्ह नोजल वगैरे ऑक्सिजन पुरवण्याच्या आवश्यकतेनुसार बदलावे लागतील.
  • दुसऱ्या गॅस सिलिंडरचा ऑक्सिजनसाठी वापर हा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावा.

 


Tags: lpg cylinders for oxygenoxygentata consultancy engineerstata consultancy serviceएलपीजी सिलिंडर्समध्ये ऑक्सिजनऑक्सिजनटाटा कन्सल्टन्सी इंजिनीअर्सटाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस
Previous Post

डॉक्टर ते अँब्युलन्स ड्रायव्हर…मोदींच्या ‘मन की बात’मध्ये मोकळा संवाद

Next Post

#मुक्तपीठ रविवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

Next Post
Viral top-10 bulletin

#मुक्तपीठ रविवारचे 'टॉप-१० व्हायरल बुलेटिन'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!