मुक्तपीठ टीम
एकीकडे देशात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अपरिहार्यतेतून लादलेल्या निर्बंधांमुळे सामान्य जनता त्रस्त झाली असतानाच, काही बॉलिवूड सेलिब्रिटी मात्र मस्त मजा करत आहेत. मालदिवमध्ये मजा करत त्याची छायाचित्र, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करणे हे सामान्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे असल्याचे मत व्यक्त होऊ लागले आहे. अभिनेत्री श्रुती हसननंतर आता अभिनेता नवाजुद्दिनने अशा सेलिब्रिटींना फटकारले आहे.
View this post on Instagram
कोरोना निर्बंधांमुळे चित्रिकरण थांबल्यामुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सध्या परदेशात आहेत. त्यातही मालदिव हा निर्बंध नसलेला देश बॉलिवूडकरांचे आवडते पर्यटन स्थळ ठरलाय. तेथे अनेक कलाकार सुट्टीसारखी मज्जा करीत आहेत. मात्र, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने त्या सेलेब्रिटींवर झोड उठवली आहे.
View this post on Instagram
नवाजुद्दीनचे फटकारे…
• ‘लोकांना पोट भरण्यासाठी अन्न नाही आणि तुम्ही पैसे उधळत आहात. जरा तरी लाज वाटू द्या!
• ते लोक कशाबद्दल बोलतील? अभिनयाबद्दल? या लोकांनी मालदिवला एक तमाशा बनवले आहे.
• माणूस म्हणून कृपया आपल्या सुट्टीतील छायाचित्रं आपल्याकडे ठेवा ही विनंती.
• प्रत्येकजण येथे या कठिण काळाला सामोरा जात आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.
• ज्यांना या कठिण परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे, त्यांना ही छायाचित्रं दाखवून त्यांचा अपमान करू नका.
• आम्ही मनोरंजन करणारे लोक आहोत, आपल्याला थोडे परिपक्व झाले पाहिजे.
• असंख्य लोक आपलं अनुकरण करतात हे आपल्याला माहित आहे तर, आपण आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.
• मी मालदिवला मुळीच जाणार नाही. मी बुधाना येथे माझ्या कुटुंबासमवेत आहे. हेच माझे मालदिव आहे
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
वाचा कोरोना संकटात मालदिव वारी! सेलिब्रिटींवर श्रुती हसन का संतापली?
कोरोना संकटात मालदिव वारी! सेलिब्रिटींवर श्रुती हसन का संतापली ?