मुक्तपीठ टीम
देशासह उत्तराखंडमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. कोरोनाने आता रामदेव बाबांच्या पंतजली योगपीठात एन्ट्री केली आहे. हरिद्वारच्या पतंजली योगपीठात ८३ लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. योगपीठात इतक्या मोठ्या संख्येनं कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आता योगगुरु रामदेव बाबांसह योगपीठातील अन्य लोकांचीही कोरोना चाचणी केली जाण्याची शक्यता आहे.
मात्र, असा दावा केला जात आहे की बाबा रामदेव यांच्या संस्थांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे नाहीत. तिजारावाला (@ tijarwala) ट्वीटर हँडलद्वारे दावा केला आहे की बाबा रामदेव संस्थांमध्ये संसर्ग झालेल्या मीडियाच्या बातम्या खोट्या आहेत. असं म्हटलं जातं आहे की पतंजलीच्या बाहेर कोरोनाची चाचणी घेण्यात येत आहे आणि कोणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला प्रवेश दिला जात नाही. योगग्राम, निर्याम, आचार्यकुलम, पतंजली इत्यादी संस्थांमध्ये कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही. या सर्व संस्थांमध्ये रुग्णांच्या चाचणी साठी कोरोना केंद्रे आहेत. ज्यांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे त्यांना संस्थांमध्ये प्रवेश देण्याची परवानगी नाही.
मीडिया में भ्रामक/निराधार अफवाहों का संज्ञान लेकर हम आगाह करते हैं कोई झूठी खबर ना चलाए।
IPD इनडोर मरीजों की आवश्यक #कोरोना की टेस्टिंग के लिए सेंटर बना रखा है। जो पोजिटिव आए उन्हें प्रवेश नहीं दिया जाता।#योगग्राम #निरामयम #आचार्यकुलम #पतंजलि संस्थानों में कोई पोजिटिव नहीं है pic.twitter.com/w66gVndIBi
— Tijarawala SK (@tijarawala) April 22, 2021
योगपीठात इतक्या मोठ्या संख्येनं कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य विभाग संसर्ग झालेल्या कोरोनाचे संपर्क साधण्यात गुंतलेला आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणारे आरोग्य विभागाचे पथक आवश्यक असल्यास योगगुरू स्वामी रामदेव बाबा यांची कोरोना चाचणी देखील घेऊ शकतात.