मुक्तपीठ टीम
कोरोनाशी लढणार्या आरोग्य रक्षकांसाठी केंद्र सरकाने एक चांगली बातमी दिली आहे. आरोग्य रक्षकांसाठीच्या विमा योजनेला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या वर्षी सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत कोरोना विरोधातील युद्धात सहभागी प्रथम-हेल्थ केअर कामगारांसाठी विमा योजना सुरू केली होती. ती आता आणखी एक वर्ष असेल.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘कोरोना संकटात प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजेसच्या अंतर्गत कोरोनाच्या साथीला लढा देणाऱ्या आरोग्य रक्षकांसाठीची विमा योजना एक वर्षासाठी वाढविली आहे.’ म्हणजेच ही विमा योजना एप्रिल २०२१ पर्यंत एक वर्षासाठी लागू राहील.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यापूर्वी घोषणा केली की, पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत कोरोना योद्ध्यांचे सर्व दावे २४ एप्रिलपर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर त्यांच्यासाठी नवीन विमा पॉलिसी लागू केली जाईल. कोरोना वॉरियर्सना कव्हर करण्यासाठी नवीन पॉलिसी दिली जाईल आणि त्यासाठी मंत्रालय न्यू इंडिया अॅश्युरन्सशी चर्चा करीत आहे.
आरोग्य कर्मचार्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही योजना सुरू केली गेली आहे, जेणेकरून कोरोनामुळे कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली जाऊ शकते. पीएमजीकेपी अंतर्गत ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे.
पाहा व्हिडीओ: