मुक्तपीठ टीम
भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातूनच नाही तर आता लहान देशांमधूनही मोठे क्रिकेटपटू उदयास येत आहेत. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, ही म्हण नेपाळचा क्रिकेटपटू कुशल भुर्तेल यांच्याशी जुळणारी आहे, कारण या २४ वर्षीय सलामीवीराने जबरदस्त विश्वविक्रम केला आहे. टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजवर कुणी केले नाही ते कुशल भुर्तेलने करुन दाखवले आहे.
टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना कुशल भुर्तेल हा तीन कसोटी सामन्यात सलग तीन अर्धशतक ठोकणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. कुशल भुर्तेलने ४६ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नेदरलँड्सविरुद्ध ६२ धावांची खेळी साकारली. त्याने विश्वविक्रम केला. यापूर्वी त्याने मलेशियाविरुद्ध ४१ चेंडूत ६१ आणि नेदरलँड्स विरुद्ध ४६ चेंडूंत ६२ धावा केल्या.
टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला १६ वर्षांहून अधिक काळ झाला आहे, पण पदार्पणानंतर कोणत्याही फलंदाजाला पहिल्या तीन डावात ५० किंवा त्याहून अधिक धावा करता आल्या नाहीत. त्याचवेळी, नेपाळमधील बुटवलमध्ये जन्मलेल्या उजव्या हाताचा सलामीवीर कुशल भुर्तेलने ही आश्चर्यकारक कामगिरी केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॉन्सिलने (आयसीसी) दोन देशांमधील खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांना टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दर्जा दिला आहे.
नेपाळ – नेदरलँड् तसेच अन्य देशांच्या संघांमधील द्विपक्षीय टी -२० सामने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा भाग आहेत. या सामन्यांमध्ये कुशल भुर्तेलने हा जबरदस्त अंदाज दाखविला आहे. कुशल भुर्तेलने १७ एप्रिल रोजी नेदरलँड्स विरुद्ध टी -२० सामन्यामधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
पाहा व्हिडीओ: