मुक्तपीठ टीम
जगभारात कोरोनाने थैमान घातले आहे. कोट्यावधींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काही देशांमध्ये कोरोनामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे, पुन्हा लॉकडाऊनची घोषणी करण्यात येत आहे. सर्वच देश कोरोनाच्या या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना एक दिलासादायक घटना समोर आली आहे, एका देशाने मास्कमुक्तची घोषणा केली आहे.
इस्त्रायल या देशाने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. जवळपास वर्षभरानंतर इस्त्रायलने देशभरात लागू असणाऱ्या मास्क वापरातील निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे. देशातील जवळपास ८१ टक्के जनतेला लस देण्यात यश मिळवल्यानंतर रविवारी या निर्णयाची घोषणा करण्यात आली. इस्त्रायलच्या या यशाकडे संपूर्ण जग एक आदर्श म्हणून पाहत आहे.
Masking in our glory, because masks are no longer required outdoors in #Israel! pic.twitter.com/8bfvuy5oyS
— Israel ישראל (@Israel) April 19, 2021
कशी केली कोरोनावर मात
- इस्त्रायल या देशाने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.
- तिथल्या सरकारने मास्क वापरातील निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे.
- खरतर ८१ टक्के जनतेच्या लसीकरणानंतर इस्त्रायलने मास्क वापरातील निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे.
- मास्क वापरातील निर्बंधांमध्ये शिथिलता आणारा बहुधा इस्त्रायल हा जगातील पहिला देश आहे.
- इस्त्रायलमध्ये फायजरच्या लशीने लसीकरण करण्यात आले.
- इस्त्रायलमध्ये १६ वर्षांवरील व्यक्तिंना लस देण्यात येत आहे.
- लसीकरणानंतर रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णाचा आकडा कमी होण्यासोबतच मृतांचा आकडाही लक्षणीयरित्या घटला.
- मात्र, परदेशी लोकांचे प्रवेश आणि लसीशिवाय इस्त्रायली नागरिकांचा प्रवेश मर्यादित आहेत. ते येताच त्यांना आयसोलेट केले जात आहे.
- इस्त्रायलमध्ये कार्यालयामध्ये मास्कचा वापर अनिवार्य केला आहे.
- ९३ लाख लोकसंख्या असलेल्या इस्रायलमध्ये आतापर्यंत ५० लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.
- कोरोना लसीकरणानंतर इस्त्रायलमधील परिस्थिती बदलली आहे.
As of today, Israelis no longer have to wear masks outdoors.
Pros: Breathing in the fresh Israeli air.
Cons: Having to actually make conversation with people who recognize you.
We’ll take it.
Shavuah Tov from #Israel! pic.twitter.com/hiFBSVPeW2
— Israel ישראל (@Israel) April 18, 2021