मुक्तपीठ टीम
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने आज एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता देशात १८ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस दिली जाणार आहे. १ मे पासून हे लसीकरण सुरू होणार आहे. याशिवाय उरलेल्या ५० टक्के लसी राज्य सरकार आणि खुल्या मार्केटला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पाश्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉक्टर, टास्क फोर्स आणि औषध निर्मिती कंपन्यांसोबत बैठक घेतली. त्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. याआधी ४५ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जात होती.
Government of India announces a Liberalised & Accelerated Phase 3 Strategy of #Covid19 Vaccination from 1st May
Government has been working hard from over a year to ensure maximum numbers of Indians are able to get vaccine in the shortest possible of time: PM @narendramodi 1/2
— PIB India (@PIB_India) April 19, 2021
देशात कोरोना लसीकरणाची तिसरी मोहीम १ मेपासून सुरु करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात कंपन्यांना लस खुल्या बाजार विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कंपन्यांनी एका महिन्यात निर्मिती केलेल्या लसीच्या ५० टक्के लसी सेंट्रल ड्रग्ज लॅबोरेटरीला म्हणजे केंद्र सरकारला द्यायच्या आहेत. उरलेल्या ५० टक्के लसी राज्य सरकार आणि खुल्या मार्केटला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
१८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याच्या निर्णयाबद्धल मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे आभार
काही दिवसांपूर्वीच मी देशातील २५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून तसा निर्णय घेण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती.
आज केंद्र शासनाने त्यावर सकारात्मक पाऊल उचलून १८ वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करून आपल्या मागणीचा विचार केला त्यासाठी पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांचे मी मनापासून आभार मानतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे
राज्यात या अनुषंगाने पुरेपूर नियोजन केले जाईल आणि लसीचा यासाठी पुरवठा वेळच्यावेळी मिळत राहील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आज केंद्र शासनाने १८ वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करून आपल्या मागणीचा विचार केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 19, 2021