रोहिणी ठोंबरे, माधुरी सुकथणकर / मुक्तपीठ टीम
भंडारा रुग्णालय अग्निकांड झालं. १० नवजात बालकांना नाहक प्राण गमवावे लागले. दिवसभर बातमी गाजली. परंतु हे पुन्हा घडू नये, कुणाचे जीवन बिघडू नये, यासाठी आपल्या www.muktpeeth.com ने उपाय शोधण्याचा प्रयत्न केला.
डॉ. विजय कदम यांनी ५ उपाय सुचवले आहेत.
सरकारने नेमलेली डॉ. साधना तायडे चौकशी समिती तीन दिवसात अहवाल सादर करेल. त्यातून काही मुद्दे पुढे येतीलच. पण डॉ. कदम यांनी सुचवलेले हे ५ उपाय विचार करावा असेच आहेत.
लिंक क्लिक करा आणि नक्की पाहा व्हिडीओ:
भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरण – मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार तात्काळ चौकशी, तीन दिवसात अहवाल
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.
त्यानुसार डॉ. साधन तायडे यांची समिती नेमण्यात आली. ही समिती तात्काळ चौकशी करणार आहे. तीन दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश समितीला देण्यात आले आहेत.