Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चंद्रपूरचा पाणी पुरवठा वाढवण्यासाठी इरई धरणावर बंधाऱ्याची सुधीर मुनगंटीवारांची सूचना

April 16, 2021
in घडलं-बिघडलं
0
sudhir

मुक्तपीठ टीम

 

चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या इरई धरणातील पाण्‍याची पातळी कमी होत चालली असुन यासंदर्भात त्‍वरीत योग्‍य नियोजन केले नाही तर मे महिन्‍यात शहरातील नागरिकांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागेल, ही बाब लक्षात घेता त्‍वरीत प्रभावी उपाययोजना करण्‍याच्‍या सुचना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्‍या.

 

या विषयासंदर्भात सुधीर मुनगंटीवार यांनी १६ एप्रिल रोजी झुमद्वारे बैठक घेतली व चर्चा केली. बैठकीला जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने, मनपा आयुक्‍त राजेश मोहिते, महापौर राखी कंचर्लावार, स्‍थायी समिती सभापती रवी आसवानी, मजीप्राचे अधिकारी आदींची ऑनलाईन उपस्‍थीती होती.

 

इरई नदीवर बंधारा बांधण्‍यासाठी व त्‍यामाध्‍यमातुन पाण्‍याच्‍या साठवणूक करण्‍यासाठी महानगरपालिकेने त्‍वरीत अंदाजपत्रक जिल्‍हाधिकारी यांचेकडे सादर करण्‍याच्‍या सुचना मुगंटीवार यांनी आयुक्‍तांना दिल्‍या. महानगरातील पाणी टंचाईचा आराखडा शासनाला सादर करून उपाययोजनांसाठी निधीची मागणी करण्‍याच्‍या सुचना त्‍यांनी जिल्‍हाधिकाऱ्यांना दिल्‍या. विहिरी व बोअरींगच्‍या पाण्‍याची तपासणी करून पाणी पिण्‍यास योग्‍य आहे किंवा नाही याबाबतचे फलक जलस्‍त्रोतांशेजारी लावण्‍याच्‍या सुचना सुध्‍दा त्‍यांनी यावेळी दिल्‍या. सार्वजनिक ठिकाणच्‍या बोअरिंग्‍ज जवळ रेन वॉटर हार्वेस्‍टींगची व्‍यवस्‍था करण्‍याचे निर्देशही त्‍यांनी यावेळी दिले. एप्रिल महिन्‍याच्‍या मध्‍यात आपण आलो असुन उन्‍हाळी झळा तापायला लागल्‍या असताना पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होवू नये म्‍हणून याविषयासंदर्भात प्रभावी उपाययोजना करण्‍याच्‍या सुचना मुनगंटीवार यांनी दिल्‍या.

 

मुनगंटीवार यांच्‍या सुचनांच्‍या अनुषंगाने या विषयाबाबत सर्व आवश्‍यक बाबी तपासुन कार्यवाही करण्‍यात येईल तसेच महानगरातील पाणी टंचाईचा आराखडा शासनाकडे पाठवून त्‍यासाठी निधीची मागणी करण्‍यात येईल असे जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने यांनी यावेळी सांगीतले.


Tags: chandrapurirai damirai riversudhir mungantiwarइरई धरणचंद्रपूर
Previous Post

देशातील १०० रुग्णालयांना ऑक्सिजन आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्राचे प्रयत्न

Next Post

महाराष्ट्रात ९५ लाख नागरिकांनी पोर्ट केलीत रेशनकार्ड

Next Post
maharashtra

महाराष्ट्रात ९५ लाख नागरिकांनी पोर्ट केलीत रेशनकार्ड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!