मुक्तपीठ टीम
देशातील बर्याच राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पण अशीही काही राज्ये आहेत, जेथे कोरोनाचा संसर्ग तेवढासा नाही. अशांपैकीच एक राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश.अशा परिस्थितीत गुजरात, मुंबई, ओडिसा येथील पर्यटक हिमाचलकडे वळले आहेत. तेथे कोरोनापासून सुरक्षित वातावरणात सुंदर निसर्गाच्या सहवासात ते राहत आहेत. त्यामुळे पर्यटनाच्या आनंदासोबत वर्क फ्रॉमची जबाबदारीही ते पार पाडू शकत आहेत. अनेक पर्यटकांनी कुल्लू जिल्ह्यात होम स्टे तीन-तीन महिन्यांपर्यंत बुक केलेले आहेत.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी होम स्टे ऑपरेटर आकर्षक ऑफर देत आहेत. काही होम स्टे ऑपरेटर ५० टक्क्यांपर्यंत सूट देत आहेत, तर काहीजण लांब बुकिंग करणार्यांना न्याहारी मोफत देत आहेत. स्वच्छ आणि शांत वातावरणात पर्वतांच्या सुंदर जागेत फिरण्याबरोबरच गर्द वनराई किंवा खोलीत बसून पर्यटक आपले कार्यालयीन कामकाजही करत आहेत.
सनशाईन कॉटेज आणि ग्रेट हिमालयन कॅफेमध्ये अनेक पर्यटक १५-१५ दिवस मुक्काम करत आहेत. होम स्टे मालकांच्या म्हणण्यानुसार दक्षिण भारतातील पर्यटक जास्त दिवस मुक्क करण्यासाठी संपर्क करत आहेत. पर्यटक दीर्घकाळ मणिकर्ण आणि मनालीऐवजी तीर्थन खोऱ्यात राहणे पसंत करत आहेत. कोरोना काळात हे पर्यटक इथल्या पर्यटन व्यवसायाला आधार ठरत आहेत.
पर्यटकांना कोरोना काळात, डोंगराळ प्रदेश, विशेषत: तीर्थ खोरे, सर्वात सुरक्षित वाटते. सॅनिटाइझ रूममध्ये बसून अधिक चांगल्या दूरसंचार प्रणालीसह कार्यालयीन कामे करणे भावत आहे. सकाळ आणि संध्याकाळी पर्यटन स्थळांचा प्रवास, ट्रेकिंग आणि सोबत कामही करायचे. त्याचबरोबर स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचा असा दिनक्रम कोणाला भावणार नाही!
पाहा व्हिडीओ: