Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“नागपूरात कोरोनाने थैमान घातले असताना फडणवीस, गडकरी कुठे आहेत?”: अतुल लोंढे

April 15, 2021
in घडलं-बिघडलं
0
Atul londhe

मुक्तपीठ टीम

 

कोरोनाची दुसरी लाट वेगाने फैलावत असून या लाटेने नागपूरमध्येही थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांचे दररोजचे आकडे पाहता नागपूरमध्ये महानगरपालिका प्रशासन अस्तित्वात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपाची मागील १५ वर्षांपासून महापालिकेवर सत्ता असून ते कोरोना आटोक्यात आणण्यावर भर देण्यापेक्षा खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. नागपूरकर एवढ्या मोठ्या गंभीर संकटाला तोंड देत असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कुठे आहेत, असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला आहे.

 

प्रसारमाध्यमांशी बोलताना लोंढे म्हणाले की, कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात नागपूर महानगरपालिकेला अपयश आल्याने उच्च न्यायालयानेही त्यांच्यावर गंभीर ताशेरे ओढलेत. शहरात १० झोन असताना या झोनमध्ये ट्रेसिंगचे काम व्यवस्थित होत नाही. तापाच्या रुग्णांना पॅरासिटेमॉलच्या गोळ्या देऊन पिटाळले जात आहे. होम क्वॉरंटाईनच्या पेशंटवर महापालिकेचे नियंत्रण नाही त्यातील अनेकजण शहरात बिंधास्त फिरून कोरोना स्प्रेडरचे काम करत आहेत. भाजी मंडईचे विकेंद्रीकरण केले पण तिथली गर्दी नियंत्रित करता येते नाही. राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले तरी त्याची व्यवस्थित अंमलबजावणीही करता येत नाही.

 

महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. केटी नगरच्या रुग्णालयात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्थाच नाही. तर ४०० बेड्सच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये २०० बेड्सच वापरात आहेत. महानगरपालिकेकडे मनुष्यबळ नसताना महापौर ५०० बेड्सचे हॉस्पिटल उपलब्ध करु अशा थापा मारत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी १० हजार रेमडेसीवर इंजेक्शन उपलब्ध करुन देतो असे जाहीर करून हेल्पलाईन नंबर जारी केला त्यावर ते इंजेक्शन मिळत नाही तेही खोटेचे निघाले. गडकरी यांनी त्यांच्या पीएसाठी कायद्याच्या बाहेर जाऊन त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले असे सांगतात मग नागपूरच्या जनतेसाठी गडकरी एवढ्या तत्परतेने काम करताना का दिसत नाहीत.

 

नागपूरच्या जनतेला भगवान भरोसे सोडून देवेंद्र फडणवीस पंढरपूरमध्ये प्रचारसभा घेत सरकारचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करु अशा वल्गना करत आहेत परंतु कोरोनाने इकडे नागपूरचाच ‘करेक्ट कार्यक्रम’ करून ठेवला आहे त्याचे काय, असा सवाल लोंढे यांनी उपस्थित केला आहे. कोरोनाचे मृत्यूही वाढत आहेत, ३ एप्रिलला ४७ मृत्यू झाले, १२ एप्रिल ६९ नंतर ७३ मृत्यू झाले. महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. आताही महानगरपालिकेला जाग आली नाही तर नागपूरची परिस्थीती आणखी चिघळेल आणि कोरोनाचा उद्रेक होईल अशी भीती लोंढे यांनी व्यक्त केली आहे.


Tags: Atul Londhedevendra fadanvisNitin Gadkariकेंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरीदेवेंद्र फडणवीस
Previous Post

सी-डॅकमध्ये आयटी इंजिनीअर्ससाठी करिअर संधी

Next Post

“अखेर शिल्लक डाळींच्या वाटपास केंद्राची मंजुरी” – छगन भुजबळ

Next Post
chhagan bhujbal

"अखेर शिल्लक डाळींच्या वाटपास केंद्राची मंजुरी" - छगन भुजबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!