देशभरातील क्रिकेट प्रेमी जिची आतुरतेने वाट पाहत असतात अशी सर्वात जास्त उत्कंठावर्धक क्रिकेट स्पर्धा सुरु झालीय. विवो आयपीएल २०२१ चे असोसिएट मीडिया स्पॉन्सर आणि भारतातील आघाडीचा टेलिकॉम ब्रँड वी ने या निमित्ताने ‘प्ले अलॉन्ग’ अर्थात खेळ पाहताना खेळा या लोकप्रिय संकल्पनेला अनुसरून सर्वांना खूप आवडेल आणि भरपूर बक्षिसे जिंकण्याची संधी देणारा उपक्रम सुरु केला आहे. लाईव्ह टी२० लीग पाहत असताना प्रेक्षक एकट्याने किंवा मित्रमंडळींसोबत खेळू शकतात. पुढचे ५२ दिवस तब्बल ६० सामने होणार आहेत, प्रत्येक मॅच पाहताना स्वतः देखील खेळण्याची आणि भरपूर बक्षिसे जिंकण्याची मस्त संधी वी ने उपलब्ध करवून दिली आहे. वी देखो भी, खेलो भी, जीतो भी या गेमिंग उपक्रमात वी ग्राहक सहभागी होऊ शकतात आणि दररोज आकर्षक बक्षिसे जिंकू शकतात. शिवाय बम्पर टूर्नामेंट पारितोषिक देखील जिंकता येणार आहे. ९ एप्रिल ते ३० मे २०२१ या कालावधीत वी ग्राहकांना याचा लाभ घेता येईल.
वी ने डिस्ने+ हॉटस्टारसोबत भागीदारी केल्यामुळे वी ग्राहकांना आपल्या मोबाईल फोन्सवर अगदी कुठेही आयपीएल टी२० खेळांचा आनंद घेता येणार आहे. त्यानंतर लगेचच वी ने ही घोषणा करून आपल्या ग्राहकांसाठी क्रिकेटची रंगत अधिकच वाढवली आहे.
“वी देखो भी, खेलो भी, जीतो भी” बद्दल अधिक माहिती
· सर्व वी ग्राहक (प्रीपेड व पोस्टपेड) नोंदणी करून गेम खेळू शकतात. यासाठी वी ऍपच्या होम पेजवर एकदाच नोंदणी करावी लागेल. यासाठी कोणत्याही अटी लागू नाहीत.
· प्रत्येक गेममध्ये ४ पायऱ्या आहेत – प्री-मॅच, प्ले अलॉन्ग, स्ट्रॅटेजिक टाईम-आऊट आणि पॉवर प्ले.
· प्रत्येक दिवसाच्या मॅचनुसार दररोज चॅलेंजेस दिली जातील.
· गेममध्ये काय घडणार याचे तुम्ही अनुमान लावू शकता – टॉस कोण जिंकणार, मॅच कोण जिंकणार, पुढच्या ओव्हरमध्ये किती रन्स काढले जाणार इत्यादी.
· तुमच्या क्रिकेटिंग ज्ञानाचा, माहितीचा उपयोग करून तुम्ही गेममध्ये अतिरिक्त गुण मिळवू शकता.
· प्रत्येक दिवसाचे मॅच परिणाम (लीडर बोर्ड) त्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर प्रदर्शित केले जातील. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या मॅचसाठी दररोज विजेत्यांची घोषणा केली जाईल.
· या गेममध्ये सहभागी होणारे वी ग्राहक ५२ दिवसांच्या कालावधीत कितीही वेळा जिंकू शकतात. किती वेळा जिंकता येईल यावर काहीही बंधन घालण्यात आलेले नाही.
· आपल्या मित्रमंडळींना, सहकाऱ्यांना, नातेवाईकांना हा गेम खेळण्यासाठी आमंत्रित करा. स्वतःच्या लीग्स तयार करा आणि एकमेकांसोबत खेळा.
· या गेममधील तुमची कामगिरी तुम्ही व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर व इंस्टाग्रामवर इतरांसोबत शेअर करू शकता.
· मित्रमंडळींना आमंत्रित करून किंवा वी ऍप मार्फत रिचार्ज/बिल भरणा करून या गेममध्ये सहभागी होणारा प्रत्येक जण बुस्टर पॉईंट्स जिंकू शकतो.
· मॅचमध्ये सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्यांसाठी दररोज बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. शिवाय टुर्नामेंटमध्ये सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्यांसाठी बम्पर बक्षिसे आहेत. काही विशिष्ट किमान गुण मिळवणाऱ्यांना लॉट्स ड्रॉनुसार मेगा पारितोषिके देखील दिली जातील.
- बम्पर बक्षिसे: फोन, बाईक, कार, लॅपटॉप, स्कुटर इत्यादी.
- दररोजची बक्षिसे: वी ग्राहक त्यांचे पॉईंट्स पुढील ठिकाणी रीडीम करू शकतात – मिंत्रा, फ्लिपकार्ट, लेन्सकार्ट, प्युमा, फासोस, झोमॅटो, क्युअरफिट, ग्रोफर्स, गोआयबीबो इत्यादी.
आणखी एका स्वतंत्र उपक्रमामध्ये वी ने आपल्या ग्राहकांना वी ‘फॅन ऑफ द मॅच’ स्पर्धेत भाग घेण्यासाठी देखील आमंत्रित केले आहे. मॅच ब्रेक्समध्ये ही स्पर्धा खेळून आयफोन्ससारखी आकर्षक बक्षिसे जिंकता येतील.
वी फेसबुक पेज, वी इंस्टाग्राम पेज आणि ट्विटरवर वी ग्राहक मॅच ब्रेक्समध्ये वी ‘फॅन ऑफ द मॅच’ खेळू शकतात. यामध्ये सहभागी होणाऱ्यांना अगदी सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, हे प्रश्न लाईव्ह सुरु असलेल्या मॅचविषयी असतील. प्रत्येक मॅचमध्ये एकूण २० प्रश्न विचारले जातील. सर्वात जास्त बरोबर उत्तरे देणाऱ्यांना पुढील प्रमाणे भेटवस्तू मिळवता येतील:
- प्रत्येक ऍड ब्रेकमध्ये सरप्राईज व्हाउचर्स
- प्रत्येक मॅचच्या शेवटी आयफोन्स – ६० मॅचेस, ६० विजेते, ६० आयफोन्स
- बम्पर बक्षीस – सीझनच्या शेवटी
दरदिवशीच्या विजेत्यांची नावे व फोटो वी सोशल मीडिया पेजेसवर प्रदर्शित केली जातील. जर तुम्ही वी ग्राहक असाल तर यंदाची आयपीएल तुम्हाला देखील विजेता बनवू शकते आणि तुम्ही देखील जिंकू शकता भरघोस बक्षिसे! डिस्ने+ हॉटस्टारवर मोफत सामने पहा, वी ‘फॅन ऑफ द मॅच’मध्ये सहभागी व्हा, प्रत्येक मॅचमध्ये बक्षिसे जिंका आणि सोशल मीडियावर लोकप्रिय व्हा!
वी ‘फॅन ऑफ द मॅच’बद्दल अधिक माहितीसाठी कृपया वी फेसबुक पेज, वी इंस्टाग्राम पेज आणि ट्विटरवर आता लगेचच लॉग ऑन करा.
About Vi:
Vodafone Idea Limited is an Aditya Birla Group and Vodafone Group partnership. It is India’s leading telecom service provider. The Company provides pan India Voice and Data services across 2G, 3G and 4G platform. With the large spectrum portfolio to support the growing demand for data and voice, the company is committed to deliver delightful customer experiences and contribute towards creating a truly ‘Digital India’ by enabling millions of citizens to connect and build a better tomorrow. The Company is developing infrastructure to introduce newer and smarter technologies, making both retail and enterprise customers future ready with innovative offerings, conveniently accessible through an ecosystem of digital channels as well as extensive on-ground presence. The Company is listed on National Stock Exchange (NSE) and Bombay Stock Exchange (BSE) in India.
The company offers products and services to its customers in India under the TM Brand name “Vi”.
Ookla® – the global leader in broadband testing and web-based network diagnostic applications, has verified Vi, based on analysis of Speedtest Intelligence® data as the fastest 4G network pan-India in Oct to Dec ’20.
For more information, please visit: www.MyVi.in and www.vodafoneidea.com | Twitter – @VodaIdea_NEWS