मुक्तपीठ टीम
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये साइन्टिफिक असिस्टंट या पदासाठी २४ जागा, ज्युनिअर आर्टिसन या पदासाठी ८६ जागा, ऑफिस असिस्टंट या पदासाठी १ जागा अशा एकूण १११ पदांवर भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, पद क्र.१ आणि ३ साठी १८ एप्रिल २०२१ तर, पद क्र.२ साठी १७ एप्रिल २०२१ रोजी थेट मुलाखत देऊ शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कम्युनिकेशन / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / प्रोसेस इन्स्ट्रुमेंटेशन / मेकॅनिकल / मेकाट्रॉनिक्स / रोबोटिक & ऑटोमेशन इंजिनिअरिंग प्रथम श्रेणी डिप्लोमा/ B.Sc. (केमिस्ट्री) (ii) 02 वर्षे अनुभव
२) पद क्र.२- i) आयटीआय इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / प्रोसेस इंस्ट्रुमेंटेशन / मेकॅनिकल (फिटर / डिझेल मेकॅनिक) किंवा ६०% गुणांसह १२वी (पीसीएम) उत्तीर्ण किंवा ६०% गुणांसह १०वी उत्तीर्ण +आयटीआय (केमिकल प्लांट ऑपरेशन) किंवा आयटीआय (अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट/केमिकल प्लांट ऑपरेशन्स) ii) २ वर्षे अनुभव
३) पद क्र.३- i) बी.एससी. / बी.ए. / बी.कॉम. ii) २ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षे असावे.
शुल्क
या पदासाठी इच्छुक असणाऱ्या कोणत्याही उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट http://ecil.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: