Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गोरेगावच्या नेस्को संकुलात आणखी १५०० खाटांची सुविधा

कोरोना सेंटरसाठी आमदार निधीतून मशिन्स देणार - सुभाष देसाई

April 12, 2021
in सरकारी बातम्या
0
subhash

मुक्तपीठ टीम

 

कोरोनाच्या वाढती संख्या लक्षात घेऊन गोरेगाव येथील नेस्को जंबो कोरोना सेंटर येथे आणखी दीड हजार रुग्णांच्या उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नुकतेच या केंद्राला भेट देऊन आढावा घेतला.

यावेळी नेस्को कोरोना केंद्राच्या प्रमुख डॉ. नीलम अंद्रादे, उपायुक्त( विशेष) संजोग कब्रे, सहाय्यक महापालिका आयुक्त( पी- दक्षिण) संतोषकुमार धोंडे तसेच महापालिका अधिकारी व अभियंता उपस्थित होते.

यावेळी डॉ. नीलम अंद्रादे यांनी रुग्णांचा औषधोपचार, प्रवेश, जेवण व साफसफाई तसेच ऑक्सिजन व इतर औषधांचा पुरवठा याबाबत माहिती दिली. तसेच रुग्णांच्या रक्त तपासणीबाबत थायरोकेअर चाचणी केंद्राशी झालेला करार याबाबत माहिती दिली.

दरम्यान, या कोरोना सेंटरला डीआर सिस्टिम व एक्सरे मशिन– सीआर सिस्टिम या यंत्रांची व्यवस्था झाल्यास रुग्णांची गैरसोय दूर होईल. दरम्यान, नेस्को कोरोना सेंटरची गरज व रुग्णसेवेसाठी आमदार निधीतून दोन्ही मशिन्स देण्याचे मंत्री सुभाष देसाई यांनी मान्य केले व लवकरात लवकर या मशिन्स रुग्णसेवेसाठी नेस्को सेंटरला सुपूर्द केल्या जातील, असे स्पष्ट केले.

subhash desai

मुंबईतील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे नेस्को संकुलात वाढीव १५०० बेड्स कार्यान्वित करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. यापैकी ५०० बेड्स ऑक्सीजन सुविधेसह सुसज्ज असतील. १५ एप्रिलपासून सर्व बेड्स कार्यान्वित करण्याचे आश्वासन महापालिका अधिकाऱ्यांनी दिले. सध्या उपलब्ध असलेल्या २९०० खाटांसह एकूण ४३०० रुग्णांची या एकाच संकुलात सोय होऊ शकेल.

रेमेडेसिवीर औषधाचा पुरेसा साठा असून अधिक सुमारे १००० व्हायल्स आजच उपलब्ध होत आहेत तर पुरेसा ऑक्सिजन जम्बो सिलिंडर व आयनॉक्स टाक्यांमध्येही उपलब्ध आहे. डॉक्टर, नर्सेस व वॉर्डबॉय नेमले असून या आठवड्यात अधिक भर पडणार आहे. अतिदक्षता विभागातील सुविधाही वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

परिसरातील स्वच्छता, शौचालयांची साफसफाई व गरम पाण्याच्या सोयीचेही निरिक्षण करण्यात येऊन आवश्यक खबरदारी घेयाच्या सूचना देसाई यांनी दिल्या.

nexso

नेस्को संकुलात आतापर्यंत १,१७,००० व्यक्तिंचे लसीकरण झाले असून मागील आठवड्यातील लसीकरणाचा पुरवठ्यातील खंड आता भरुन निघाला असून दररोज ६ हजार व्यक्तिंचे लसीकरण पूर्ण केले जात आहे.

 


Tags: mumbaiउद्योगमंत्री सुभाष देसाईडॉ. नीलम अंद्रादेनेस्को संकुलमुंबईरेमेडेसिवीर औषध
Previous Post

जिल्हा नियोजन समितीचा ३० टक्के निधी कोरोनासाठी वापरण्यास परवानगी

Next Post

“शासकीय वसुली थांबवण्यासाठी कोळी समाजाने वंचितच्या उमेदवाराला निवडून द्यावे” – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
prakash ambedkar

"शासकीय वसुली थांबवण्यासाठी कोळी समाजाने वंचितच्या उमेदवाराला निवडून द्यावे" - ॲड. प्रकाश आंबेडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!