Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऑक्सिजन कमी पडू नये, कोरोना मृत्युदर कमी करा- छगन भुजबळ

April 12, 2021
in घडलं-बिघडलं
0
chhagan bhujbal

मुक्तपीठ टीम

 

कोरोना रूग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ऑक्सिजन अभावी रुग्ण न दगवता मृत्युदर कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

 

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक येवला विश्राम गृह येथे पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, प्रांताधिकारी अधिकारी सोपान कासार, डॉ.अर्चना पठारे, तहसिलदार प्रमोद हिले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, शरद घोरपडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कृपास्वामी, गटविकास अधिकारी उन्मेष देशमुख, तालुका पोलीस अधिकारी अनिल भावारी, येवला पोलीस निरीक्षक संदीप कोळी आदी उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना पालकमंत्री भुजबळ म्हणाले, कोरोना रुग्ण संख्या शून्यावर येईपर्यंत सर्वांनी आवश्यक काळजी घ्यावी. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी डोअर टू डोअर तपासणी करण्यात यावी. खाजगी डॉक्टर्स, परिचारिकांची मदत घेण्यात यावी. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सुयोग्य नियोजन करून त्याचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी. लॉकडाऊन यशस्वी करणे ही पोलिसांची मुख्य जबाबदारी आहे. त्यांनी ती पार पाडावी असे सांगून खडक माळेगाव येथे डिसीएचसी रुग्णालय सुरू करण्याचे आदेशही यावेळी त्यांनी दिले.

व्यापारी,लोकप्रतिनिधीशी चर्चा

 

येवला शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला येथील संपर्क कार्यालयात व्यापारी प्रतिनिधी तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेऊन सामाजिक जबाबदारी म्हणून सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.

 


Tags: chhagan bhujbalcoronamahaarashtraoxygen supplyडोअर टू डोअरमंत्री छगन भुजबळमहाविकास आघाडी
Previous Post

राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

Next Post

जिल्हा नियोजन समितीचा ३० टक्के निधी कोरोनासाठी वापरण्यास परवानगी

Next Post
ajit pawar

जिल्हा नियोजन समितीचा ३० टक्के निधी कोरोनासाठी वापरण्यास परवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!