मुक्तपीठ टीम
युद्ध म्हटले की हानी ठरलेलीच. मग ती जीविताची असो वा मालमत्तेची. त्यातही मालमत्तेची भरूनही येऊ शकते, जीविताची हानी ही कधीही भरून न येणारी. फ्रान्सचे सैन्य लवकरच आपल्या रोबोट डॉगसह युद्धासाठी उतरणार आहे. सध्या फ्रान्स सैन्याद्वारे या रोबोट डॉगची चाचणी घेण्यात येत आहे. सैन्याने रोबोट डॉगची चाचणी रात्री आणि दिवसा आपल्या सरावासाठी केली. सुरुवातीच्या तपासणीत ते बर्यापैकी फायदेशीर असल्याचे सिद्ध होत आहे.
स्पॉट नावाचा हा रोबोट डॉग अमेरिकेची कंपनी बोस्टन डायनेमिक्सने तयार केला असून ती गुगलच्या मालकीची आहे. यात कॅमेरे आहेत आणि त्याला रिमोट कंट्रोलद्वारे ऑपरेट केले जाऊ शकते. विशेष गोष्ट म्हणजे त्याचे डिझाइन, जे इतर रोबोट्सपेक्षा चांगले आहे. याला कुत्र्यांसारखे ४ पाय आहेत, ज्यामुळे ते चाक किंवा इतर प्रकारच्या रोबोटमुळे होणाऱ्या अडथळ्यांना सहज पार करू शकते. त्यात चांगले संतुलन आहे आणि खड्डे असलेल्या ठिकाणी देखील सहजतेने धावू शकतो.
चाचणी केलेल्या अहवालानुसार या रोबोट डॉगने सैनिकांची गती थोडी कमी केली, परंतु यामुळे त्यांना सुरक्षित राहण्यास मदत झाली. याशिवाय त्याची बॅटरी डाऊन होण्याची समस्याही समोर आली. पण नंतर सैनिक म्हणाले की, जिथे आम्ही रोबोटचा वापर केला नाही तिथे गोळ्या झाडल्या. जिथे रोबोट डॉग सोबत चालला होता, तिथे लक्ष्य ठेवल्याशिवाय आम्ही आमची मोहीम पूर्ण करण्यास सक्षम होतो.
सध्या याचा वापर केवळ युद्ध क्षेत्राच्या नेव्हिगेशनसाठी केला आहे आणि तो बांधकाम साइट्स, खाणी, कारखाने आणि भूमिगत सर्वेक्षणात उपयुक्त ठरला आहे. पण येत्या काही वर्षांत याचा सैन्य, पोलीस, संरक्षण, शोधमोहीम इत्यादी भागात मोठ्या प्रमाणात वापर सुरू होईल.
पाहा व्हिडीओ: