मुक्तपीठ टीम
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारच्या मध्यरात्री जवळपास दोन वाजता ही आग लागली. सतरा बालकांपैकी ७ बालकांना वाचविण्यात यश आले आहे.
शनिवारी रात्रीच्या दरम्यान अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बोर्न युनिट मधून धूर निघत असल्याचे समोर आले ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितला असता त्या रूम मध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या SNIC मध्ये फुटबॉल आणि इन वन अशी दोन युनिट आहेत यापैकी मॉनिटर मध्ये असलेले सात बालक वाचविण्यात आले तर औट बॉल युनिटमधील १० मुलांचा मृत्यू झाला.
दरम्यान आपल्या नवजात बालकांना गमावल्याने आई-वडिलांसह कुटुंबियांनी टाहो फोडला. रुग्णालयाबाहेर लोकांची गर्दी झाली. या आगीच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी हे लोक करत आहेत. तर रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे दहा बालकांचा नाहक बळी गेल्याचा आरोप काही मृत बालकांच्या नातेवाईकांनी केला आहे.
या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हदरवून टाकल्याने सर्वसामान्यांपासून राजकीय नेत्यांनी या घटनेची दखल घेत हळहळ व्यक्त केली आहे. तसेच या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करवी, असे म्हणत क्रोध व्यक्त केला.
दरम्यान, “ही दुर्घटना अत्यंत भीषण असून, आगीत वाचलेल्या ७ बालकांसाठी तातडीने दुसरे नवजात शिशु केअर सेंटर सुरू करून त्यांच्यावर तिथे उपचार करण्यात आले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप सांगता येऊ शकत नाही. त्यासाठी तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून, पुढील दोन ते तीन तासांमध्ये आगीचे नेमके कारण समजू शकेल”, असे भंडारा जिल्ह्याधिकारी संदीप कदम यांनी म्हटले आहे.
लिंक क्लिक करा पाहा व्हिडीओ –